भूमीअभिलेख संगमेश्वरच्या अधिकाऱ्यांच्या अनागोंदी कारभाराचा प्रथितयश पत्रकारालाच फटका… पत्रकार 15 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करणार…

Spread the love

कार्यालयात उपलब्ध नसलेले खोटे नकाशे व उपधीक्षक यांना कोणते अधिकार नसताना खोट्या नकाशाच्या आधारे हायवेच्या नकाशात दुरुस्ती…

संगमेश्वर | ऑगस्ट १३, २०२४- गेली दोन वर्ष तक्रार अर्ज असतानाही कोणतीही कारवाई डिपार्टमेंट करत नाही .तक्रारीची साधी दखलही घेण्याचे सौजन्य न दाखवणाऱ्या भूमीअभिलेख अधिकाऱ्यांविरुद्ध आता आमरण उपोषण करूनच न्याय मिळवणार अशी भूमिका घेणार असल्याची माहिती संगमेश्वर तालुक्यातील अनेक प्रश्नांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणाऱ्या पत्रकार श्री. मकरंद सुर्वे यांनी दिली. महामार्गात चुकीच्या पद्धतीने जमिनींचे व्यवहार करत जमीन हडपण्याच्या अक्षम्य प्रकारास मूक संमती देऊन माझ्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करणाऱ्या उपअधिक्षकांनी यासाठी मुस्ताक अहमद नूरखान खान यांच्याकडून लाच घेतली होती का याची सखोल चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी घेऊनच १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आमरण उपोषणाला बसणार आहे. असे ते म्हणाले.

उपअधीक्षक भोसले व त्यांना सहकार्य करणारे अधिकारी यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत….

उपअधीक्षक भूमी अभिलेख देवरुख तात्कालीन उपाध्यक्ष भोसले यांनी संबंधित जमीन मालकाचा साधा अर्ज घेऊन नकाशामध्ये दुरुस्ती केली आहे. कोणतेही अधिकार उपाधीक्षकांना नसताना चुकीच्या पद्धतीने दुरुस्त करण्यात आले. माझ्या जमिनीचा नकाशा उपलब्ध नसताना मला जीर्णमुकावरून खोटा नकाशा देण्यात आला. मी पैसे भरून सदर नकाशा व इतर सर्व नकाशे पाहणी केली असता जीर्णो कुठेही दिसून आलेले नाही. त्यामुळे सदर नकाशा रद्द करावा अशी मागणी केलेली असताना सदर विषयावरती कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. गेली दोन वर्ष हा विषय कारवाई शिवाय पडू आहे. हायवेचे सक्षम अधिकारी उपविभागीय अधिकारी रत्नागिरी हे आहेत. परंतु त्यांच्याकडून कोणतीही परवानगी नसताना व अर्जदाराने कोणतेही अर्ज उपविभागीय अधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेला नसताना यांनी परस्पर नकाशामध्ये दुरुस्ती केली साधी नोटीसही जमिनीचा मालक म्हणून मला देण्यात आलेली नाही. त्यामुळे भोसले व त्याला साथ देणारे सर्व अधिकारी यांची सखोल चौकशी करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी पत्रकार मकरंद सुर्वे यांचे आहे. दरवेळी अधीक्षक भूमि अभिलेख रत्नागिरी यांच्याकडे पत्र देण्यात येतात पत्र उपाधीक्षकांकडे जातात परंतु त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाहीत.

महसूल मंत्री ,उपसंचालक भूमी अभिलेख ,अधीक्षक भूमी अभिलेख यांच्या पत्रांना कोणतीही कारवाई नाही

या प्रकरणात अमोल भोसले व कर्मचारी पिरजादे व इतर अधिकारी कार्यरत होते . त्यामुळे त्यावेळी कार्यरत असलेल्या सर्वांची सखोल चौकशी केल्यावर त्यांच्या चौकशीतूनच सत्य बाहेर येईल. सदर प्रकरण महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे-पाटील साहेब यांच्यापर्यंत पत्राद्वारे पोहचवले आहे. त्याचप्रमाणे मा. उपसंचालक, भूमीअभिलेख व मा. भूमीअभिलेख अधिक्षक, रत्नागिरी यांच्याशीही पत्रव्यवहार केलेले आहेत.

गेली दोन वर्ष कारवाई होत नसल्याने आपल्या अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम डिपार्टमेंट करत आहे…

गेली दीड ते दोन वर्ष भूमी अभिलेख देवरुख यांच्याकडे अर्ज दिलेले आहेत. त्यावरती उपाधीक्षक याने सुनावणी घेतली होती त्यानंतर सर्व नकाशे काढण्यात आले होते त्यासाठी मी पैसेही खर्च केले आहेत. एवढे सगळे असताना नकाशे दिलेले असताना त्याच्यावरती योग्य कारवाई उपाधीक्षक यांच्याकडून करण्यात आलेली नाही. प्रत्येक वेळेला कार्यालयात जायचं आणि दुरुस्ती झाली की नाही हे विचारायचं तर प्रत्येक वेळेला करतो म्हणून सांगण्यात आले परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. उप अधीक्षक यांना चुकीच्या पद्धतीने दुरुस्ती करण्यात आले हे माहिती आहे त्यांना महाराष्ट्र महसूल अधिनियम 257 खाली अधीक्षक यांच्याकडे दुरुस्तीसाठी पाठवण्याचे अधिकार आहेत . परंतु तसा प्रस्ताव अधीक्षक यांच्याकडे पाठवण्यात येत नाही. चुकीच्या पद्धतीने दुरुस्त केलेल्या आपल्या खात्यातील अधिकाऱ्यांना वाचवण्याचे काम डिपार्टमेंट करत आहे ही बाब खेदजनक आहे.

खोट्या नकाशा देणाऱ्यांवर कारवाई करावी…

डिपारमेंट मध्ये जुना हवेचा नकाशा मध्ये आमचा सर्वे नंबर आहे त्यावेळी त्याचे पैसे भेटले होते. आत्ताच्या हायवे चा नकाशा मध्ये जमीन माझ्या मालकीची असल्यामुळे मला त्या जमिनीचे पैसे मिळाले आहेत. कोणतीही तक्रार नकाशा चुकीचा असलेल्याची प्रांत अधिकारी किंवा लवाद मध्ये करण्यात आलेली नाही. तरीही खोटा नकाशा च्या आधारे भोसले यांनी दुरुस्ती केली. तो नकाशा व मला देण्यात आलेला जीर्ण बुक वरील नकाशा हे दोन्ही नकाशे डिपार्टमेंट ने कोठे तयार केले आहेत त्यामुळे ते तात्काळ रद्द करावे अशी माझी मागणी आहे.

जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषणावर ठाम…

सर्व कागदपत्रांची छाननी करून आणि यामधील प्रत्येक व्यक्तीची सखोल चौकशी करून सत्य बाहेर येईलच. मात्र तरीही माझ्या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि लवकरात लवकर न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषणासारख्या मार्गाचा अवलंब करून सत्याग्रह करण्यावर मी ठाम आहे.” अशी माहिती श्री. सुर्वे यांनी दिली. आज संगमेश्वर तालुक्यामध्ये भूमी अभिलेखच्या कामावरती प्रचंड लोक नाराज आहेत. याप्रकारे काम होणार असेल तर प्रशासनाने नागरिकांची सनद बनवून काय मिळवले हा प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page