चिपळूण मोरवने येथे सासरच्या छळाला कंटाळून
विवाहितेची आत्महत्या

Spread the love

चिपळूण :- सासरच्या लोकांनी विवाहीत महिलेला मानसिक त्रास दिल्याने या त्रासाला कंटाळून अखेर मोरवणे येथील ४० वर्षीय विवाहितेने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे .
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कविता हणमंत पवार ( ४० ) असे मृत महिलेचे नाव आहे . याबाबत मृत विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार पती हणमंत श्रीरंग पवार , शशिकांत श्रीरंग पवार , शशिकांत पवार , रोशन पवार ( मूळ रा . खटाव , जि . सातारा , सध्या रा . मोरवणे ) या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे . याबाबत मृत महिलेच्या भावाने चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे . त्यानुसार त्याचे वडील आजारी असल्याने बहीण कविता हणमंत पवार हिला त्याने घरी राहण्यासाठी बोलावून घेतले . याचा राग धरून पतीने पत्नी कविता हिला फोन करून , ” तुझ्या वडिलांना माती दे आणि चिपळूणला ये . तुला दाखवितो ” अशी धमकी दिली . या धमकीला घाबरून कविता ही तत्काळ चिपळूणमध्ये दाखल झाली . यानंतर सासरकडील आरोपी चौघांनी तिचा मानसिक छळ सुरू केला . अखेर या त्रासाला कंटाळून तिने विष प्राशन केले . आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल चौघांविरोधात चिपळूण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून ही घटना दि . १९ नोव्हेंबर रोजी घडली . या प्रकरणी चिपळूण पोलिस या चौघांचा शोध घेत आहेत .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page