रत्नागिरी, दि. 9: (जिमाका) – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत जिल्ह्यातील एकूण 2 लाख 74 हजार 346 लाभार्थ्यांना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यांचा लाभ 82 कोटी 30 लाख 38 हजार रकमेचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
तालुकानिहाय अनुक्रमे प्राप्त अर्जांची संख्या आणि वितरीत होणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे. मंडणगड-10 हजार 178, रक्कम-5 कोटी 45 लाख 34 हजार. दापोली-31 हजार 370, रक्कम-9 कोटी 41 लाख 10 हजार. खेड-29 हजार 304 रक्कम-8 कोटी 79 लाख 12 हजार. चिपळूण-43 हजार 778, रक्कम-13 कोटी 13 लाख 34 हजार. गुहागर-25 हजार 543, रक्कम-7 कोटी 36 लाख 29 हजार. संगमेश्वर-32 हजार 532 रक्कम-9 कोटी 75 लाख 96 हजार. रत्नागिरी-53 हजार 912 रक्कम-16 कोटी 17 लाख 36 हजार. लांजा-18 हजार 901 रक्कम-5 कोटी 65 लाख 3 हजार. राजापूर- 29 हजार 828 रक्कम-8 कोटी 94 लाख 84 हजार.
मुख्यमंत्री वयोश्री योजना
मुख्यमंत्री वयोश्री योजनेत 3 हजार 90 लाभार्थ्यांना 92 लाख 70 हजार होणार वितरण
वयाची 65 वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांनी वयोमानपरत्वे येणारे अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना म्हणून त्यांना आवश्यक सहाय उपकरणे, साधने खरेदी करण्यासाठी त्याबरोबर मन:स्वास्थ्य केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेत 3 हजार रुपयांप्रमाणे साधने घेण्यासाठी लाभ देण्यात येणार आहे.
तालुकानिहाय अनुक्रमे नोंदणी केलेल्या अर्जांची संख्या आणि देण्यात येणारी रक्कम पुढीलप्रमाणे आहे….
मंडणगड-97, रक्कम-2 लाख 91 हजार, दापोली-137. रक्कम-4 लाख 11 हजार. खेड-21 रक्कम-63 हजार. चिपळूण 469 रक्कम-14 लाख 7 हजार. गुहागर 231 रक्कम-6 लाख 93 हजार. संगमेश्वर-872 रक्कम-26 लाख 16 हजार. रत्नागिरी-486 रक्कम-14 लाख 58 हजार. लांजा-117 रक्कम-3 लाख 51 हजार. राजापूर-660 रक्कम-19 लाख 80 हजार असे एकूण 3 हजार 90 लाभार्थ्यांना 92 लाख 70 हजार रक्कम वितरीत करण्यात येणार आहे.