कार्यकर्त्यांनी तयारीला लागण्याचे आवाहन…भाजपा संगमेश्वर उत्तर मंडळ कार्यकारणी मेळाव्यात मार्गदर्शन…भाजपा तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली भाजपा कार्यकर्त्यांचा मेळावा
*संगमेश्वर-* रत्नागिरी संगमेश्वर आणि संगमेश्वर चिपळूण विधानसभा मतदारसंघात भाजपाचा उमेदवार उभा राहणार असून कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच जोमाने तयारीला लागा असे आवाहन भाजपा माजी आमदार बाळ माने यांनी केले. भारतीय जनता पार्टी संगमेश्वर उत्तर मंडळ कार्यकारणी मिळावा संगमेश्वर जवळच्या स्वाद कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
भाजपा तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के यांच्या अध्यक्षते खाली मेळावा पार पाडला. या मेळाव्याला विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव, जिल्हाध्यक्ष राजेश सावंत ,भाई जठार ओबीसी जिल्हाध्यक्ष, ऋषिकेश केळकर युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष विनोद मस्के, सदस्या दीपिका जोशी, जेष्ठ कार्यकर्त्या माधवी भिडे , चंद्रशेखर निमकर, डॉ अमित ताठरे,कोमल रहाटे, राकेश जाधव, मिथुन निकम, सतीश पटेल,आदी मान्यवर उपस्थित होते.
*यावेळी बोलताना बाळ माने म्हणाले की….*
“भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्याने कोणतेही भावनिक राजकारण न करता वास्तव्याचे राजकारण करावे. कोणत्याही प्रकारची शंका कुशंका न बाळगता कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या पूर्व तयारीला लागून पक्ष वाढीला प्राधान्य देणे आवश्यक आहे. संगमेश्वर चिपळूण आणि रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदार संघात भाजपचाच उमेदवार उभा राहील असे सांगत कार्यकर्त्यांनी आतापासून तयारीला लागावे असे सांगितले . भाजपा कार्यकर्त्यांनी प्रत्येकाच्या घरोघरी भेटून त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात तसेच शासन शासनातर्फे विविध योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत असताना जिल्हा परिषद पंचायत समिती आणि सरपंच निवडणुकीची तयारी करण्यात यावी.
“संगमेश्वर चिपळूण विधानसभेमध्ये विधानसभा क्षेत्र प्रमुख प्रमोद अधटराव हेच आपले उमेदवार असून त्यांची जन्म कुंडली मी पाहून आलो असून त्यांना उत्तम योग असल्याचे सांगत आपणही रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार बाळ माने यांनी केले.
भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी संगमेश्वर तालुक्यातील तीन आमदार कोण आहेत हे भारतीय जनता पार्टी ठरवेल .जनता ही राजा असते त्यामुळे मी जिंकतोय म्हणजेच मी राजा आहे असे कोणी ठरवू नये .नळ पाणी योजनेची विविध कामे प्रतीक्षेत आहेत त्या ठिकाणी कार्यकर्त्याने जाऊन कामकाज चालू कसे आहे हे पहावे. हे राजकारण आहे त्यामुळे युती कधीही तुटू शकते त्यामुळे आतापासूनच आपला उमेदवार उभा असेल असे समजून कार्यकर्त्यांनी निवडणुकीसाठी तयार राहावे असे सांगितले
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य दीपिका जोशी यांनी ज्यांना पाच वर्ष निवडून दिले ते परत येत नाहीत असे सांगत विविध योजना तळागाळाशी पोचवा असे सांगितले
यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.
हा मेळावा यशस्वी व्हावा म्हणून तालुकाध्यक्ष विनोद म्हस्के,नुपुरा मुळ्ये,डॉ अमित ताठरे,मिथुन निकम,सतीश पटेल,शितल दींडे,अविनाश गुरव,दिपीका जोशी,राजेश आंबेकर मंगेश साळवी,स्वप्निल सुर्वे,राकेश जाधव,कोमल रहाटे, दिपीकाताई जोशी,मंगेश साळवी,स्वप्निल सुर्वे,राकेश जाधव,कोमल रहाटे ,शैलेश धामणस्कर,अनंत दुदम,बावा जड्यार,अर्शद काझी,गणपत कांबळे,संतोष गुरव,वैष्णवी चव्हाण,सुमन झगडे,प्रियांका साळवी,सरिता आंबेकर,योगेश जोगले,जयंत आमकर,महादेव किंजळकर,अशोक दोरकडे,
काशिराम फटकरे आदींनी प्रयत्न केले.