दहिवली ग्रामपंचायतील झेंडेवाडी येथे रस्त्याचे भूमिपूजन माजी सभापती अमर मिसाळ यांच्या हस्ते भूमिपूजन

Spread the love

नेरळ : सुमित क्षीरसागर

कर्जत तालुक्यातील नेरल जवळ दहिवली ग्रामपंचायत हद्दीत झेंडेवाडी येथे नवीन रस्त्याचा आज भूमिपूजन पार पाडलं दहिवली ग्रुप ग्रामपंचायत हद्दीमध्ये मध्ये ५ लक्ष आमदार महेंद्र थोरवे यांच्या स्थानिक विकास निधीतून देण्यात आले अनेक वर्षांपासून झेंडेवाडीतील स्थानिक आदिवासी समाजाची मागणी होती त्याची पूर्तता आज पूर्ण झाली
झेंडेवाडी येथील पाण्याचा प्रश्न देखील मोठा होता तो ही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून एक बोंरग मारून पाण्याचा प्रश्न मार्गी लावला
माजी सभापती अमर मिसाल यांनी आमदार साहेबांकडे पाठपुरावा करून हा निधी उपलब्ध करून घेतले
स्थानिक आदिवासी बांधवांनी अमर शेठ मिसाळ आणि आमदार साहेबांचं आभार मानले प्रयत्नातून आपल्या ग्रामपंचायत हद्दीत अनेक विकासाची कामे कार्यसम्राट आमदार महेंद्र थोरवे यानी अनेक कामे या ग्रामपंचायत साठी उपलब्ध करुन दिले

अमर मिसाळ यांचे एकच लक्ष आपल्या ग्रामपंचायत चा विकास आणि डेव्हलपमेंट कशी होईल हाच ध्यास यांनी ठेवला आहे मग दहिवली कोदिवले बिरदवले हांबारपाड मालेगाव वंजरपाडा झेंड्याचे वाडी असे अनेक गावांमध्ये विकास कामाचा झणझणाता महेंद्र शेठ थोरवे यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळत आहे
या भूमीपूजन प्रसंगी माजी सभापती अमर मिसाळ ग्रामपंचायत सदस्य नरेश काळेकर विष्णू वाघमारे बंधू गायकवाड सुनील विरले निलेश विरले मंगेश मोघे सुनील बांगारे भास्कर शेंडे कैलास विरले जनार्दन निरगुडा संतोष मेंगाल जैतु मेंगाल नाथा मिसाळ आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page