जनता दरबाराला कुडाळ मालवण मधील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद….
पालकमंत्री सन्मा. चव्हाण साहेबांचे मनःपूर्वक आभार.. कुडाळ मंडल अध्यक्ष श्री. संजय वेंगुर्लेकर यांचे प्रतिपादन..
*सिंधुदुर्ग/प्रतिनिधी:-* पालकमंत्री सन्मा. श्री. रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आयोजित जनता दरबारामध्ये आज कुडाळ मालवण विधानसभा क्षेत्रानून जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासनाच्या विविध विभागाशी संबंधित तब्बल 713 निवेदने यावेळी सादर करण्यात आली. यापैकी 286 निवेदनांवर तात्काळ चर्चा करून प्रश्न निकाली काढण्यात आले.
पालकमंत्री सन्मा. रवींद्रजी चव्हाण साहेब आणि माजी खासदार श्री. निलेशजी राणेसाहेब यांच्याकडे अनेक ग्रामस्थांनी आपली गाऱ्हाणी मांडली.जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद सिईओ, प्रांत, पोलीस अधीक्षक, यांच्याबरोब विविध विभागाचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यामुळे ज्या विभागाशी संबंधित निवेदन त्या विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून अनेक प्रश्न तात्काळ मार्गी लावण्यात आले.जनता दरबाराला चांगला प्रतिसाद मिळाला.