संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे प्रस्थान, विठू नामाच्या गजरात आळंदी दुमदुमली, मुख्यमंत्र्यांनी घेतलं ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन…

Spread the love

विठू नामाच्या गजरात दुमदुमली आळंदी

आळंदी (पुणे): कैवल्य चक्रवर्ती साम्राज्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 193 पालखी व्या (Sant Dnyaneshwar Maharaj) पालखी प्रस्थान सोहळ्याला सुरुवात झाली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आळंदी सजली असून हजारो वारकरी या पालखी सोहळ्यात सहभागी झाले आहेत. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आळंदीमध्ये दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे दर्शन घेतलं. आज संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं आळंदीमधून पंढरपूरच्या दिशेनं प्रस्थान झालं आहे.

‘ज्ञानोबा माऊली तुकारामां’चा गजर

भगव्या पताका, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि ‘ज्ञानोबा माऊली तुकारामां’चा गजर करत दिंड्या, तसेच पालखीसमवेत राज्याच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येनं वारकरी आळंदी नगरीत दाखल झाल्यानं, इंद्रायणी काठ वारकऱ्यांनी गजबजून निघाले होते. इंद्रायणीतीरी दिवसभर फेर, फुगड्या, नामघोष करून वारकरांनी पालखी प्रस्थानपूर्वीचा मनसोक्त आनंद लुटला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page