*गुहागर/ प्रतिनिधी –* गुहागर विधानसभा मतदार संघातील एक मोठ नाव म्हणजे संतोष दादा जैतापकर हे आहे . जनतेच्या सेवेसाठी नेहमीच तत्पर असतात आणि एकदा जर शब्द दिला तर तो नक्कीच पूर्ण करतात अशीच त्याची ख्याती आहे. असाच एक विषय गुहागर तालुक्यातील कोळवली गावात पिण्याच्या पाण्याची समस्या होती आणि आजी माजी सर्व प्रतिनिधी यांना सांगून वाडीतील पदाधिकारी कंटाळे होते. नंतर त्यांनी श्री संतोष दादा जैतापकर यांना वाडी पूजेला बोलवून आपली समस्या त्याच्या समोर मांडली जो कोणी आमच्या पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवेल त्यांच्या पाठीशी पूर्ण वाडी उभी राहिल असा शब्द दिला. संतोष दादा जैतापकर यांनी आपली समस्या नक्कीच मी सोडवेन असा शब्द दिला.
परंतु कोणत्याही सरकारी योजनेतून होत नसल्यामुले संतोष दादा जैतापकर यांनी स्वतः स्वखर्चाने कोळवली गुरव वाडी ला स्वखर्चाने दहा हजार लिटर च्या 2 टाक्या दिल्या.
संतोष दादा जैतापकर यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल वाडीने त्याचे आभार मानले आणि वाडी नेहमीच तुमच्या पाठीशी आहे असा शब्द दिला.