किल्ले रायगडावर शरद पवार गटाच्या ‘तुतारी’ चिन्हाचे अनावरण; रायगडावर ‘तुतारी’चे नाद घुमले…

Spread the love

रायगड- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या तुतारी चिन्हाचं अनावरण करण्यात आलं आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं. या कार्यक्रमाला शरद पवार स्वतः उपस्थित होते. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, अमोल कोल्हे आणि सुप्रिया सुळे यांनी तुतारी वाजवून आगामी निवडणुकींचं रणशिंग फुंकलं. या कार्यक्रमात शरद पवारांच्या हस्ते या चिन्हाचे अनावरण करण्यात आले. तुतारी हे चिन्ह सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास शरद पवारांनी यावेळी व्यक्त केला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस’ चिन्ह बहाल करण्यात आले आहे. आज रायगडावर भव्य कार्यक्रम पार पडला. ‘तुतारी’ चिन्हांचं लॉन्चिंग या वेळी करण्यात आले. केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाच्या ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शरदचंद्र पवार’ पक्षाला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ हे पक्षचिन्ह बहाल केले आहे. न्यायालयाच्या पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाकडे हे चिन्ह असणार आहे. दरम्यान या पक्षचिन्हाचा जास्तीत जास्त प्रचार, प्रसार व्हावा यासाठी शरद पवार गटाकडून प्रयत्न केला जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सकाळी या चिन्हाचे अनावरण किल्ले रायगडावर करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार असं नाव दिलं होतं. त्यानंतर पक्षाला तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह बहाल करण्यात आलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह हे अजित पवारांना बहाल केलं होतं. त्याविरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची यावर पुढचे निर्देश येईपर्यंत तुतारीवाला माणूस हेच शरद पवार गटाचे पक्षाचे चिन्ह असणार आहे. तुतारीवाला माणूस या चिन्हावर शरद पवार गटाला यापुढच्या निवडणुका लढवाव्या लागणार आहेत. शरद पवारांना मिळालेले नाव आणि चिन्हही कायम राहू शकतं असं मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील अँड. सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. शरद पवार गट न्यायालयात जाईल आणि आपल्याला मिळालेलं नाव आणि चिन्ह कायम राहावं अशी कदाचित मागणी करतील असाही अंदाज त्यांनी व्यक्त केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page