
देवरुख /प्रतिनिधी- देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाने उभारलेल्या कोकणातील पहील्या खाजगी बाल वैज्ञानिक सेंटरचे संस्थेच्या देवरू़ख सावरकर चौक येथील जागेत जिल्हातील विद्यार्थी वर्गामध्ये विज्ञान विषयक जागृती व्हावी तसेच भविष्यात नवे संशोधक तयार व्हावेत या उद्देशाने सृजन सायन्स अँण्ड इन्होव्हेशन अँक्टिव्हिटी (बाल वैज्ञानिक) सेंटरची उभारणी केली आहे.
१४ कोटी रुपयांचा हा प्रकल्प उभारण्यात आला आहे यात क्लाॅक टाॅवर इमारतीत चार हाॅल, अँम्पी थिएटर, ओपन सायन्स हाॅल, इन्होवेशन हब यामध्ये आठ विषयांच्या प्रयोगशाळा, एक्झिबिशन हाॅल, वर्गखोल्या, आउटडोअर सायन्स पार्क यांची निर्मिती झाली आहे.
या बाल वैज्ञानिक सेंटरचे उद्घाटक सुप्रसिद्घ अणुशास्ञज्ञ पद्मविभूषण डाॅ.अनिल काकोडकर यांचे हस्ते करण्यात आले
त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन राज्यमंञी रविंद्र माने. आमदार शेखर निकम; माजी आमदार सुभाष बने पद्मविभूषण डाॅ.जेष्ठराज जोशी संस्थेचे अध्यक्ष सदानंद भागवत. संस्थेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होतेदुसऱ्या टप्प्यात दुर्बिण प्रणाली, थ्रीडी थिएटर, अवकाश संशोधन याची निर्मिती होणार आहे.
या सेंटरमधे जिल्हातील मुलांना विज्ञानविषयक माहितीव मार्गदर्शन देण्यात येणार आहे. जिल्हातील शाळांनी २ ते३ दिवसांचा अभ्यास दौरा आयोजित करून विद्यार्थ्यांना प्रयोगशिल बनविणेसाठी हे बाल वैज्ञानिक सेंटर मार्गदर्शक ठरणार असून विद्यार्थी वर्गाला विज्ञानाला अनुसरण प्रयोग करणे सुकर जाणार आहे.