पिरंदवणे, गुरववाडी येथे रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न.

Spread the love

रामभक्तीत तरुणाई दंग…!

पिरंदवणे | जानेवारी ०१, २०२४.

पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र, अयोध्या येथे संपन्न झालेल्या श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा उत्साह संपूर्ण देशात पहावयास मिळत असतानाच ऐक्य नाट्य मंडळ गुरववाडी, पिरंदवणे यांच्या माध्यमातून सार्वजनिक सभागृह, गुरववाडी येथे श्रीरामाचे पूजन करण्यात आले.

यानंतर सर्वजण ग्रामदेवता लक्ष्मी मंदिरातील थेट प्रक्षेपणाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. आरत्या व महाप्रसाद मंदिरात झाला. सायंकाळी पुन्हा एकदा ढोल-ताशांचा गजर करत ग्रामस्थांनी आपला आनंद व्यक्त केला. दिवसभर विविध उपक्रम करत गावातील भक्तीमय वातावरण वृद्धिंगत केले. दिवेलागणीच्या वेळेस दीपोत्सव करून परिसर उजळून निघाला. गुरववाडीतील ग्रामस्थांनी आज एक अलौकिक वातावरण अनुभवले.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page