दत्तजयंतीचे औचित्य साधत नेरळ पायरमाळ येथे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे अनावरण.दर्शनासाठी भक्तांची उसळली लाट.

Spread the love

नेरळ- सुमित क्षीरसागर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र ,शाखा नेरळ यांच्या वतीने दत्तजयंतीचे औचित्य साधुन नेरळ (पायरमाळ) येथे श्री स्वामी समर्थ महाराज्यांच्या प्रतिमेचे अनावरण नेरळ परिसरातील प्रतिष्ठित व्यक्तीच्या शुभहस्ते करण्यात आले आहे त्याच सोबत श्री दत्त जन्मदिन सोहळा देखील उत्साहात साजरा करण्यात आला.गेली सात दिवस येथे गुरुचरित्र पारायण देखील स्वामी सेवेकरी करत होते.दरम्यान दर्शनासाठी येथे भक्तांची गर्दी उसळली होती. मंगळवार 26 डिसेंबर रोजी श्री दत्त जन्मदिन सोहळा असल्याने नेरळ परिसरातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात मोठ्या प्रमाणात स्वामी सेवेकरी समोरच महा प्रसादाचे आयोजन केले गेले होते.नेरळ पायरमाळ येथे नुकताच श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र नव्याने उभारण्यात आले असून श्री दत्त जन्मदिनाचे औचित्य साधून येथे श्री स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे अनावरण अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्राणित सेवा केंद्र शाखा नेरळ यांच्या वतीने

करण्यात आले होते, त्याच सोबत श्री दत्त जन्मदिन सोहळा देखील उत्साहात साजरा करण्यात आला होता.या वेळी नेरळ शहराचे प्रथम नागरिक असलेले नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच उषा पारधी, उपसरपंच मंगेश म्हसकर,सदस्य श्रद्धा कराळे,संतोष शिंगाडे,पार्वती पवार,जयश्री मांनकामे,उमा खडे,राजन लोभी यांसह स्वामी सेवेकरी वर्ग तर नेरळ परिसरातील राजकीय पुढारी,तर प्रतिष्ठित व्यक्ती व हजारो भक्तगण येथे दर्शनाचा लाभ घेण्यासाठी उपस्थित झाले होते.यावेळी एक चिमुरडा येथे स्वामींच्या वेशभुषा करून आल्याने या चिमुरड्याचे दर्शन देखील स्वामी भक्तगण घेत होते.खरं तर लहान मुले ही देवघरची फुले असे म्हटले जाते आणि याच मुळे या चिमुरड्याला येथील उपस्थित भक्तांनी घेराव घातला होता.दरम्यान गेली सात दिवस येथे सेवेकरीवर्गाने गुरूचरित्र पारायण केले होते,सोबतच येणाऱ्या भक्तांसाठी भोजनाची म्हणजेच महाप्रसादाची सोय केलेली पाहायला मिळाली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page