संत्र्यांनी भरलेल्या टेम्पोला लागली आग

Spread the love

खेड : – शहरातील डाक बंगला परिसरात एम . आय . बी . हायस्कूलजवळ हसीब पॅलेस या इमारतीच्या पार्किंग भागात उभ्या असलेल्या संत्र्यांनी भरलेल्या टाटा कंपनीची मिनी टेम्पो ( एम . एच . ५० एन १८७३ ) ला मंगळवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली .
या आगीमध्ये जवळपास संपूर्ण टेम्पो आगीच्या भक्षस्थानी पडला . या घटनेची माहिती जागरूक नागरिकांनी नगर परिषद अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आल्यानंतर नगरपरिषद अग्निशामक दलाचे जवान शाम देवळेकर , दीपक देवळेकर , गजानन जाधव , साहिल साबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली . घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार जुबेर मुमेन या व्यक्तीच्या मालकीचा हा मिनी टेम्पो असून या आगीमध्ये मुमेन या व्यक्तीचे नुकसान झाले आहे .

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page