संगमेश्वर /दिनेश अंब्रे- नावडी येथील प्रतिष्ठित नागरिक श्री. संजय परशुराम रेडीज यांची सुकन्या कुमारी नेहा संजय रेडीज या सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (MREGS), पंचायत समिती मंडणगड येथे काही दिवसांपूर्वीच नियुक्ती झाली आहे.
नेहा रेडीज यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रशाळा संगमेश्वर नं. २ येथे झाले. तसेच माध्यमिक शिक्षण पैसाफंड हाईस्कूल व उच्च शिक्षण आठल्ये सप्रे पित्रे महाविद्यालय देवरूख येथे झाले. नंतर त्यांनी m.com पोस्ट ग्रॅज्युएशन केले. मेहनत, जिद्द, चिकाटीने संजय रेडीज यांनी कष्ट घेतले व आपल्या लाडक्या एकुलत्या एक कन्येला उच्चशिक्षण दिले.
आई वडिलांची खूप इच्छा होती की आपली मुलगी शासकीय नोकरी मध्ये लागावी. या महिन्यातच पंचायत समिती ( मंडणगड) येथे रिक्त जागेवर हजर झाल्याने संगमेश्वर येथील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. वडील संजय व आई संगीता यांचे अतिशय आनंद झाल्याने आश्रूने डोळे पाणावले.
संगमेश्वर येथील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन शिरगावकर, संजय शिंदे, दिनेश अंब्रे यांनी श्रीफळ पुष्पगुच्छ देवून त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन अभिनंदन केले. नेहा रेडीज ह्यांचावर संगमेश्वर मधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.