बारामतीत पवारांच्या कुटुंबात पहिल्यांदाच दोन दिवाळी पाडवे; गोविंदबागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजितदादांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी…

Spread the love

पुणे- राज्याच्या राजकारणात सुरु असलेला संघर्ष आता पवार कुटुंबात देखील पाहायला मिळत आहे. इथून पाठीमागे अख्खं पवार कुटुंब ‘गोविंदबाग’ या शरद पवारांच्या निवासस्थानी पाडवा साजरा करायचं. पवार कुटुंबियांना भेटण्यासाठी महाराष्ट्रभरातून कार्यकर्ते यायचे. मात्र आता पहिल्यांदाच पवारांच्या बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार दोन वेगवेगळ्या ठिकाणी दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. गोविंदबागेत शरद पवारांना तर काटेवाडीत अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर पवारांची ही दुसरी दिवाळी आहे. दरवर्षी पाडव्याच्या दिवाशी बारामतीतील गोविंदबागेत पवार कुटुंब एकत्र येतं. या कार्यक्रमाला प्रामुख्यानं शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे हे आलेल्या नागरिकांच्या शुभेच्छा स्विकारतात. यंदाच्या गोविंदबागेतील पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही? याबाबत साशंकता होती. मात्र आता अजित पवारांनी आपला पाडवा काटेवाडीतील निवासस्थानी स्वतंत्र साजरा करायचं ठरवलं आहे. दिवाळीचा पाडवा संपूर्ण पवार कुटुंब बारामतीकरांसोबत साजरा करत आलं आहे. असा आजपर्यंतचा इतिहास आहे. सध्या बारामतीचं राजकारण तापलं असून बातामतीत काका विरुध्द पुतण्या संघर्ष पहायला मिळत आहे.अशातच दादांनी वेगळी भुमिका घेतली आहे. मात्र याबद्दल आपल्याला काही माहिती नसल्याचं सुप्रिया सुळेंच म्हणणं आहे. त्यामुळे नात्यात आणखी दुरावा झाल्याचं बोललं जात आहे.

शरद पवार यांना भेटण्यासाठी असंख्य कार्यकर्ते ‘गोविंदबाग’ या त्यांच्या बारामतीतील निवास्थानी दाखल झाले आहेत. पवारांना भेटण्यासाठी कार्यकऱ्यांनी गर्दी केली आहे. काहीही झालं तरी शरद पवार आमच्यासाठी सर्वकाही आहेत. त्यांना भेटण्यासाठी आम्ही आलो आहोत. वर्षानुवर्षे आम्ही त्यांना भेटायला येतो. गेली 18 वर्षे मी शरद पवारांना भेटण्यासाठी, त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी येत असतो, असं एका कार्यकर्त्याने सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आज पाडवा मेळावा आयोजित केला आहे. बारामतीतील काटेवाडीमध्ये दिवाळीनिमित्त भेटीगाठींचा सोहळा आयोजित केला आहे.

पाडव्याची सुरुवात ही काटेवाडीतच झाली आहे, असं म्हणत अजित पवार यांनी आपण काटेवाडीत पाडवा साजरा करणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर आता आज अजित पवारांना भेटण्यासाठी कार्यकर्यांनी गर्दी केली आहे. अजित पवार त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार, जय पवार कार्यकर्त्यांच्या शुभेच्छांचा स्विकार करत आहेत. पाडव्याची सुरुवात काटेवाडीतूनच झाली. अजितदादा काम करणारा नेता आहे. त्यांना भेटण्यासाठी आल्याचं कार्यकर्त्याने सांगितलं. राजकीय दृष्ट्या आम्ही वेगवेगळा मार्ग स्विकारला आहे. मात्र कुटुंब म्हणून आम्ही एक आहोत, असं सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबिय म्हणताना दिसले. मात्र आता पहिल्यांदाच बारामतीत दोन दिवाळी पाडवा साजरा केला जात आहे. त्यामुळे पवारांमध्ये राजकीय संघर्ष सुरु आहे. शिवाय कुटुंबात देखील फूट पडल्याचं पाहायला मिळत आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page