
संगमेश्वर – संगमेश्वर पोलीस ठाण्यातील पोलीस पाटलांची मासिक सभा ; श्रमसाफल्य सभागृह ; पोलीस ठाणे संगमेश्वर येथे पोलीस निरीक्षक अमीत यादव यांचे मार्गदर्शनात संपन्न झाले
ही मासिक सभा ऐन दिवाळीत पार पडली ; सभेला बहुसंख्य पोलीस पाटील उपस्थित होते ; विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर अमित यादव यानी उत्तम मार्गदर्शन केले .
आजच्या सभेचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे ; पोलीस ठाण्याच्या वतीने सर्व पोलीस पाटलाना दिवाळी फराळाची मेजवानी देणेत आली….
यावेळी जेष्ठ पोलीस पाटीलानी अशा प्रकारचा दिवाळी फराळ प्रथमच देण्यात आल्याचे सांगण्यात आले . पोलीस पाटील हे आपले कुटुंबियच आहेत असा संदेशही पोहचवला गेला असे कौतुगोद्गार पोलीस पाटलानी व्यक्त केले .
आपल्या घरापासुन दुर ड्युटी करत असतानाही ; पोलीस पाटलांविषयी हे प्रेमा व्यक्त केले त्यासाठी पोलीस पाटलानी कृतज्ञता व्यक्त केली तसेच सर्व कर्मचाऱ्यानी पोलीस पाटलांचे घरी दिवाळीत भेट द्यावी असे निमंत्रणही दिले .
यावर्षीच्या गणपतीतही पोलीस यादव अन सहकाऱ्यानी खुप पोलीस पाटलांचे घरी श्रींचे दर्शन घेतल्याची आठवण पोलीस पाटील अप्पा पाध्ये यानी करुन दिली.