निलम राणे यांनी देवरूख ग्रामीण भागातील महिलांशी साधला संवाद…

Spread the love

महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायण राणेंना मतदान करण्याचे आवाहन

देवरूख- रत्नागिरी – सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार श्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सौ. निलमताई राणे यांचा जिल्हा दौरा सुरु असुन आज देवरूख ग्रामीण भागाचा दौरा करून अनेक महिलांशी संवाद साधला. तसेच जिल्हा सरचिटणीस सौ. संगिता जाधव यांनी आयोजित केलेल्या महीला मेळावा उपस्थित राहून मार्गदर्शन केले. त्यावेळी सौ.निलमताईंनी राणेंना मतदान करून विजयी करण्याचे आवाहन केले. सौ. निलम राणे यांनी देवरूख शहरातील महिलांच्या गाठीभेटी घेत संवाद साधला तसेच काहीं महीला पदाधिकारी यांच्या वैयक्तिक गाठी भेटी घेवून प्रचारात सक्रिय सहभाग घेवून गावातील महिलाभगिनींचे जास्तीत जास्त मतदान होईल याकडे लक्ष देण्याची सूचना केली.

यावेळी केंद्रीय मंत्री ना. नारायण राणेंना निवडून आणण्यासाठी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून मतदान करावे, असे आवाहन केले. महिलांनी सुध्दा उस्फुर्त प्रतिसाद देऊन राणेना निवडून आणण्याचा निर्धार केला.

यावेळी राष्ट्रवादीच्या सौ. पुजा निकम. तालुकाध्यक्ष मालती करंबेळे. उत्तर रत्नागिरी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा सौ. सुजाता साळवी , संगमेश्वर महीला तालुकाध्यक्षा स्नेहा फाटक. माजी नगराध्यक्ष मृणाल शेट्ये. जिल्हा पदाधिकारी मुकुंद जोशी, सुशांत मुळे. अमोल गायकर उपस्थित होते.
यावेळी सरचिटणीस सौ. संगिता जाधव यांनी सौ. राणे व सौ. निकम यांचा सत्कार केला.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page