आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू…

Spread the love

अकोला : अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ दोन कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन चिमुकल्‍यांसह सहा जणांचा मृत्‍यू झाला असून यात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्‍या पुतण्‍याचाही समावेश आहे. तसेच तीन जण जखमी झाले असून त्‍यांना उपचारासाठी रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे. हा अपघात अकोला-वाशिम महामार्गावरील पातूर घाटाजवळ उड्डाणपुलावर दुपारी ३ वाजेच्‍या सुमारास झाला, अशी माहिती संबंधीत अधिकाऱ्याने दिली.

शिवाणी आमले, अस्मिता आमले, सुमेध इंगळे, शंकर ठाकरे, सिद्धार्थ इंगळे आणि किरण सरनाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक अशी मृतांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील त्यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात या वाहनातून प्रवास करत होते. या प्रवासादरम्यान त्यांच्या आणि दुसऱ्या वाहनाची जोरदार धडक झाली. हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे.

या अपघातात तीन जण जखमी झाले असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्यावर तत्काळ उपचार सुरू करण्यात आले आहेत. या अपघातानंतर घटनास्थळापासून काही अंतरावर असणाऱ्या गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन तत्काळ मदतकार्य सुरू केले. ज्यानंतर गावकऱ्यांच्या मदतीने जखमींना बाहेर काढण्यात आले. यानंतर तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली. दरम्‍यान, मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page