चिपळूण रेल्वे स्थानकाचा होतो आहे कायापालट! मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घातले लक्ष….

Spread the love

चिपळूण येथील रेल्वे स्थानक परिसराचा कायापालट होत आहे. येथील सुशोभीकरणाने वेग घेतला असून, येत्या काही महिन्यांत चिपळूण रेल्वे स्थानकाला नवा साज मिळणार आहे. सध्या होणारी गैरसोय दूर होणार असल्याने प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. मुंबई-गोवा मार्गावरील वालोपे रस्ता ते रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाली होती. याबाबत लोकप्रतिनिधी, राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच प्रवाशांमधून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी केली जात होती.

अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर होण्यास मदत झाली आहे. रेल्वे स्थानक परिसरात वाहने पार्किंग शेडची व्यवस्था नव्हती. तसेच प्रवाशांची गर्दी झाल्यास अथवा रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर पाऊस, उन्हात उभे राहायचे म्हटले तर कोणतीही सोयी सुविधा नाही. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे निदर्शनास येत होते. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कोकण रेल्वे मार्गावरील चिपळूणसह खेड रेल्वे स्थानक परिसराचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेतला.

यानुसार चिपळूण रेल्वे स्थानक परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. सुशोभीकरणांतर्गत परिसराचे पहिल्या टप्प्यात काँक्रिटीकरण झाले आहे, तर दुसऱ्या टप्प्यात शेड पार्किंग, इलेक्ट्रिकल, स्टोन पिचिंग आदी कामे केली जाणार आहेत. या कामांसाठी ५ कोटी निधी मंजूर झाला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page