रायगड: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे सत्र चालू असून रायगड जिल्हाधिकारी योगेश म्हसे पाटील यांची बदली झाली असून त्यांच्या जागी नव्याने कोकण आयुक्त कार्यालयात असणारे किसन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडी सरकारकडून बदल्यांचे सत्र मोठ्या प्रमाणावर चालू असून आपल्या मर्जीतील अधिकारी आणण्याच्या खटाटो राज्यातील सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्री करीत असून त्याचाच एक भाग म्हणून रायगड चे विद्यमान जिल्हाधिकारी योगेश म्हसे पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी कोकण आयुक्त कार्यालयात असणारे किसन जावळे यांची रायगड जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती करण्यात आल्याचे अप्पर मुख्य सचिव नितीन गद्रे यांनी काढलेल्या प्रसिद्ध पत्रकार स्पष्ट केले आहे.