भिमराज क्रिडा मंडळ मार्फत कापसाळ बौध्दवाडी सारनाथ बुध्द विहार येथे बुध्द पौर्णिमा हा कार्यक्रम प्रमुख अतिथी म्हणून भाजप ओबीसी मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष, समाजसेवक, तरुणांचे प्रेरणास्थान मा.श्री.संतोष जैतापकर साहेब यांच्या प्रमुख उपस्थिती मधे संपन्न झाला…
गुहागर विधानसभा मतदार संघातील, चिपळूण तालुक्यातील कापसाळ गावात भिमराज क्रिडा मंडळ मार्फत बौध्दवाडी सारनाथ बुध्द विहार येथे बुध्द पौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,
यां कार्यक्रमासाठी मा श्री संतोष दादा जैतापकर यांनी उपस्थित राहावे अशी आयोजकाची विनंती होती. आयोजकाच्या विनंतीला मान देऊन मा श्री संतोष दादा जैतापकर साहेब उपस्थित होते,
व त्यांच्या बरोबर मा.सरपंच हेदवी ग्रामपंचायत श्री.गजानन हेदवकर व श्री आदेश जाधव (समाजसेवक) हे सुद्धा उपस्थित होते.
कार्यक्रमात वाडीतील सर्व रहिवाशी सोबत पाणी टंचाई विषयावर चर्चा करण्यात आली. त्यांवर साहेबांनी वाडीतील सर्व रहिवाशांना पाणी टंचाई विषय लवकरात लवकर सोडवू आणि गुहागर मतदार संघात पाण्यापासून कुणीही वंचित राहू देणार नाही असे आश्वासन दिले..
भिमराज क्रिडा मंडळ यांचे सर्व युवा पदाधिकारी व कार्यकर्ते आणि वाडीतील सर्व महिला मंडळ यांच्या हस्ते साहेबांचे हार्दिक स्वागत, सत्कार आणि छत्रपती शिवाजी महाराज (रुद्राचा अवतार) यांची मूर्ती भेट देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले..