संगमेश्वर तालुक्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या पंचक्रोशीतच मताधिक्य घटले, मताधिक्य घटल्याने शेखर निकम यांच्या विजयासाठी अखेरच्या फेरीपर्यंत संघर्ष..

Spread the love

सुरेश सप्रे/देवरुख- चिपळूण-संगमेश्वर विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांनी अखेरीस बाजी मारली असली तरी  मतदारसंघातील विकास कामे जोमाने मार्गी लावण्यासाठी कोट्यवधीचा निधी आणला तरी ही मतदारांनी भरभरुन मते दिली नाहीत हे निकालावरून स्पष्ट झाले आहे..

संगमेश्वर तालुक्यातील भाजपाच्या काही प्रमुख पदाधिकारी यांचे गावात व पंचक्रोशीत निकम यांना कमी मतदान झाले असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.    

यात प्रामुख्याने भाजपचे तालुकाध्यक्ष रुपेश कदम व विनोद म्हस्के यांच्या पंचक्रोशीतील मतदान केंद्रावर मताधिक्य मिळाले नाही

म्हस्के यांच्या २२०निवळी. २२२नायरी. २२५अंत्रवली. २४५.२४७ कसबा.२३६उमरे.२४१ भीमनगर२२७ फणसवणे या गावात  तर कदम यांच्या हातीव गावातील ३०१. ३०२,३०३या तीन ही बुथसह २६६कुंडी.२६७ बेलारी.या केंद्रावर महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांना आघाडी मिळाली नाही..

तसेच भाजपाचे देवरूख शहर अध्यक्ष व माजी उप नगराध्यक्ष सुशांत मुळे यांच्या कार्यक्षेत्र असलेल्या मुळगावी ३१५ फणसटसह ३१४ आंबवली .३१३ सांगवे.२८९ कुडवली. २८२ साडवली २९० व २९१ देवरूख या बुथवर ही शेखर  निकम यांना आघाडी मिळाली नसल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले असल्याने  तालुक्यात भाजपाची ताकद वाढली असल्याचा दावा फोल ठरल्याचेच दिसून येते असल्याने महायुतीत विविध चर्चांना उधाण आले आहे

या निवडणुकीत महायुतीचे मताधिक्य घटल्याने आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत याचा मोठा फटका स्वबळाचा नारा देण्याऱ्या भाजपाला बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे ..

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page