पुणे- पुणे- सोलापूर रस्त्यावरील कवडीपाट टोल नाका जवळील भलं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. हे होर्डिंग गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरील होर्डिंग होतं. या होर्डिंगखाली मिरवणुकीसाठी आणलेला बँड पथकातील घोडा अडकला आहे. होर्डिंग अंगावर पडल्यामुळे घोडा गंभीर जखमी झाला आहे. तसेच गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोर दुचाकी, कारसह बँड वादकांच्या वाहनांचं मोठे नुकसान झाले आहे. मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे.
पुणे-सोलापूर मार्गावरील कवडीपाट टोल नाका जवळ गुलमोहर लॉन्स या कार्यालयासमोरच रस्त्याकडेला असलेले होर्डिंग कोसळले. याखाली दुचाकी, चारचाकी वाहनांसह बँड पथकाच्या गाडीचे मोठे नुकसान झाले. यावेळी नवरदेवाला मिरवणुकीसाठी आणलेला घोडा सुद्धा होर्डिंग अंगावर पडल्यामुळे गंभीर जखमी झाला आहे. या घटनेत बँड पथकाचं मोठं नुकसान झालं असून त्यांचा नवरदेवासाठी आणलेला घोडाही गंभीर जखमी झाला आहे.
पुणे सोलापूर महामार्गावरील लोणी काळभोर या ठिकाणी ही घटना घडली आहे. या घटना वारंवार घडत असूनही प्रशासनाकडून काहीच उपाय योजना होत नसल्याचे समोर आले आहे. होर्डिंग गुलमोहर लॉन्समध्ये लग्न समारोह पार पडला होता. यावेळी बँड पथक कार्यालयाबाहेर उभे होते. त्यावेळी होर्डिंग कोसळले व त्याखाली बँड पथकासह मिरवणुकीसाठी आणलेला घोडाही अडकला होता. होर्डिंग अंगावर पडल्यामुळे घोडा गंभीर जखमी झाला आहे. त्याला बाहेर काढण्यात आले. गुलमोहर लॉन्स कार्यालयासमोर अनेक दुचाकी, कार पार्किंग केल्या होत्या. त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.