संगमेश्वर- संगमेश्वर पोलीस स्टेशनचे सहा. पो.फौजदार प्रशांत शिंदे बक्कल नं.१०७२ यांची तेहतीस वर्षे पोलीस खात्यात सेवा झाली असून त्यांना त्यांच्या आदर्श व ऊत्तम कामगिरीसाठी पोलीस खात्याकडील पोलीस महासंचालक पदक सन २०२४ चे नुकतेच प्राप्त झाले असून त्यांचा कोकण सुपूत्र रत्नागिरीच्या जिल्हा येथील पोलीस तपास (मिडीया) साप्ताहिकचे ,सह संपादक व सामाजिक कार्यकर्ते सुरेश विठोबा साळवी यांच्या शुभहस्ते शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ व साप्ताहिक पोलीस तपास (वार्तापत्र ) चे “देवमाणूस अंक” देऊन यथोचित सत्कार करण्यात आला .
व यापुढील काळात असेच प्रेरणादायी सेवा करावी,त्यासाठी उत्तम आयुष्य व आरोग्य लाभो, अशा प्रकारे पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
शिंदे यांना यापूर्वी सेवा काळात अनेक गौरव पदके प्राप्त झाली आहेत…
अशा आदर्श व गुणवान पोलीस सहाय्यक उपनिरीक्षक प्रशांत शिंदे साहेब यांना पोलीस तपास साप्ताहिक परिवारातर्फे पुढील वाटचालीस मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा!
सदर सत्कार प्रसंगी संगमेश्वरचे पोलीस उपनिरीक्षक शंकर नागरगोजे तसेच पो.हवालदार सचिन कामेरकर महिला पो.अंमलदार क्रांती सावंत , म.पो.अंमलदार नेत्रा कामेरकर ,म .पो.अंमलदार योगिता बरगाळे उपस्थित होते.