हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्र आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वतीने महामार्ग मृत्युंजय दूत ग्रुपच्या प्रतिनिधींना व नागरिकांना ३० हेल्मेटचे मोफत वाटप…

Spread the love

साखरपा- राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत हातखंबा महामार्ग पोलीस मदत केंद्र आणि अल्ट्राटेक सिमेंट कंपनीच्या वतीने आज बुधवारी महामार्ग मृत्युंजय दूत ग्रुपच्या प्रतिनिधींना व नागरिकांना ३० हेल्मेटचे मोफत वाटप करण्यात आले. सामाजिक बांधिलकीच्या नात्याने अल्ट्राटेक सिमेंटच्यावतीने सामाजिक उपक्रम म्हणून हेल्मेटचे वितरण केल्याने मृत्युंजय दूत ग्रुप आणि नागरिक यांच्यामधून समाधान व्यक्त केले जात आहे.

याप्रसंगी सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल बोंद्रे, विक्रम पाटील, अंमलदार मुरकर, जाधव, नाटेकर, गिरीश सावंत, उतेकर, आणि अल्ट्राटेक कंपनीचे अधिकारी नीरज सर, क्रांतीकुमार लंका, प्रभाकर कांबळे, पवन मिस्त्री, मृत्युंजय दूत प्रतिनिधी आणि आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी रस्त्यावर वाहन चालवताना टेन गोल्डन रुल्स बाबत सखोल मार्गदर्शन पोलीस मदत केंद्राच्यावतीने करण्यात आले. यानंतर उपस्थितांचे आभार विक्रम पाटील यांनी मानले व सर्वांना शुभेच्छा दिल्या.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page