जोस बटलरच्या तडाखेबंद खेळीने गुजरात टायटन्सचा एकतर्फी विजय; आरसीबीचा 8 विकेट्स ने उडवला धुव्वा…

Spread the love

*बंगळुरू-* गुजरात टायटन्सने यजमान रॉयल चॅलेंजर्सचा 8 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. आरसीबीने गुजरातला विजयासाठी 170 धावांचं आव्हान दिलं होतं. गुजरातने हे आव्हान अवघ्या 2 विकेट्सच्या मोबदल्यात 13 बॉलआधी पूर्ण केलं. गुजरातने 17.5 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 170 धावा केल्या. जोस बटलर आणि साई सुदर्शन या दोघांनी गुजरातच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. तसेच शुबमन आणि शेरफेन रुदरफोर्ड या दोघांनीही बॅटिंगने योगदान दिलं. गुजरातचा हा सलग दुसरा विजय ठरला. तर आरसीबीचा हा या मोसमताील आणि घरच्या मैदानातील पहिला पराभव ठरला.

अर्शद खानने विराट कोहलीला बाद करत बंगळुरूला पहिला धक्का दिला. फिल सॉल्टला जोस बटलरने जीवदान दिलं पण तो याचा फायदा उठवू शकला नाही. त्याने १४ धावा केल्या. मोहम्मद सिराजने त्याला बाद केलं. सिराजनेच देवदत्त पड्डीकलला माघारी धाडलं. पॉवरप्लेच्या षटकांचा बंगळुरू फायदा उठवू शकलं नाही. रजत पाटीदार स्थिरावलाय असं वाटत असतानाच इशांत शर्माने त्याला बाद केलं. यानंतर लायम लिव्हिंगस्टोन आणि जितेश शर्मा यांनी सहाव्या विकेटसाठी ३८ चेंडूत ५२ धावांची भागीदारी केली. साईकिशोरच्या गोलंदाजीवर आक्रमण करण्याचा जितेशचा प्रयत्न फसला. त्याने २१ चेंडूत ३३ धावांची खेळी केली. जितेशच्या जागी आलेल्या टीम डेव्हिडने लिव्हिंगस्टोनला चांगली साथ दिली. लिव्हिंगस्टोनने ४० चेंडूत १ चौकार आणि ५ षटकारांसह ५५ धावांची खेळी केली.

टीम डेव्हिडने १८ चेंडूत ३२ धावा केल्या. या तिघांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे बंगळुरूने १६९ धावांची मजल मारली. मोहम्मद सिराजने ३ तर साई किशोरने २ विकेट्स घेतल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातचा कर्णधार शुबमन गिल झटपट बाद झाला. पण यानंतर साई सुदर्शन-जोस बटलर जोडीने दुसर्‍या विकेटसाठी ४७ चेंडूत ७५ धावांची भागीदारी करत बंगळुरूच्या गोलंदाजांना निरुत्तर केलं. हेझलवूडने सुदर्शनला बाद केलं. सुदर्शन बाद झाल्यावर बटलरने सामन्याची सूत्रं हाती घेतली. शेरफन रुदरफोर्डने त्याला चांगली साथ देत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. बटलरने ३९ चेंडूत ५ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी केली. रुदरफोर्डने १८ चेंडूत ३० धावांची खेळी करत बटलरला चांगली साथ दिली.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page