संगमेश्वर- शिवसेना पक्षाच्या भगव्या सप्ताहाला कसबा जिल्हा परिषद गटातून मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. कसबा येथील कालभैरव सभागृहात पार पडलेल्या या भगव्या सप्ताहाला माजी राज्यमंत्री रवींद्र माने , शिवसेना जिल्हाप्रमुख विलास चाळके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने जिल्हा परिषद सदस्या रचना महाडिक, नेहा माने . वेदा फडके, सुजित महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी बोलताना जिल्हा सह संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक म्हणाले की…
“शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. संगमेश्वर चिपळूण मतदार संघामध्ये शिवसेनेचा आमदार असावा त्यासाठी पक्षप्रमुखांकडे आपली भूमिका मांडली पाहिजे. पूर्वीच्या प्रमाणे जोमाने संघटना वाढवण्यासाठी सर्वांनी कामाला लागा. निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्याची मागणी आहे मात्र महाविकास आघाडी असल्याने पक्षप्रमुखांचा आदेश सर्वश्रेष्ठ मानून काम करणार असल्याचे राजेंद्र महाडिक पुढे बोलताना म्हणाले.
माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी शिवसेना संघटन बांधण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने तसेच इतर मान्यवरांनी यावेळी भाषणे केली यावेळी आजी माजी जिल्हा सदस्य ,विभाग प्रमुख , शाखाप्रमुख उपस्थित होते. नावडी जिल्हा परिषद गट आणि कसबा जिल्हा गटातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते