
चिपळूण (प्रतिनिधी):– भाजपा महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री ना. नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ शिवसेना उपनेते माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना कोकरे जि.प.गटाची बैठक कुटरे (खोतवाडी) येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.
या बैठकीला उपतालुकाप्रमुख सिद्धार्थ कदम, जिल्हा परिषद माजी महिला बालकल्याण समिती सभापती सौ.प्रज्ञाताई धनावडे, आण्णा विचारे, अरविंद कदम यांनी उपस्थित ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
यावेळी उपतालुकाप्रमुख सौ. निकम, विभागप्रमुख राजू गुजर, विभाग संघटक समित जाधव, उपविभागप्रमुख अमित खातू , उपविभागप्रमुख सुधाकर लाड, युवा विभागप्रमुख सागर तांदळे, गावागावातील शाखाप्रमुख,गटप्रमुख,बुथप्रमुख,महिला पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी या सर्वांनी कोकरे जिल्हा परिषद गटातून माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री महायुतीचे उमेदवार ना. नारायणराव राणे जास्तीत जास्त मते मिळवून देण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी मतदारांपर्यंत सर्वांनी पोहोचण्याचा निर्णय घेतला. ही बैठक यशस्वी करण्यासाठी कोकरे जि. प. गटातील शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेहनत घेतली.