दिनांक 2 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशीभविष्य मधून ‘या’ राशीच्या लोकांना मिळेल कामात यश; वाचा राशीभविष्य…

Spread the love

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल? जोडीदाराची साथ कोणाला मिळेल? कशी मिळेल? तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 02 मार्च 2024 च्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ…

▪️मेष :

आज चंद्र तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संपूर्ण दिवस आप्तेष्टांसह हर्षोल्हासात घालवू शकाल. नव्या वस्त्रांची आणि दागिन्यांची खरेदी करू शकाल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान होतील. दुपारनंतर मात्र आपणास संयमित राहावं लागेल. नव्या ओळखी विचार पूर्वक कराव्यात. खर्चात वाढ होईल. एखादे नुकसान संभवते. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आपल्या कृती नियंत्रित ठेवा.

▪️वृषभ :

आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यावसायिकांसाठी लाभदायी आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी असेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. व्यवसायात सहकारी आपणांस मदत करतील. दुपारनंतर मनोरंजनाचा आनंद लुटाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. भागीदारांशी मतभेद संभवतात.

▪️मिथुन :

आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. कामात अडचणी येतील. वाद होण्याची शक्यता असल्यानं बौद्धिक चर्चेत आज सहभागी न होणं हितावह राहील. संतती विषयक काळजी निर्माण होईल. दुपार नंतर घरातील वातावरण शांत असल्यानं मानसिक दृष्टया आपणास ताजेतवानं वाटेल. शारीरिक स्वास्थ्य सुधारेल. व्यवसायात सहकारी अपेक्षित सहकार्य करतील. आर्थिक लाभ होतील. कामात यशस्वी व्हाल.

▪️कर्क :

आपल्यासाठी चंद्र चौथ्या स्थानी असेल. आज काही ना काही कारणानं आपणास नैराश्य येईल. त्याचा आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होईल. शक्यतो आज प्रवास टाळावेत. स्थावर संपत्तीचा व्यवहार न करणं हितावह होईल. आईची तब्बेत बिघडू शकते. मनात विचारांचे वादळ उठेल. दुपारनंतर परिस्थितीत बदल होऊन शारीरिक प्रसन्नता जाणवेल. नव्या कामात अडथळे येतील.

▪️सिंह :

आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज अचानकपणे प्रवास घडतील. नवीन कार्यारंभ कराल. परदेशातून लाभदायक बातमी मिळण्याची शक्यता आहे. फायदेशीर गुंतवणूक करू शकाल. दुपार नंतर अधिक भावनाशील व्हाल. मनात निराशेची भावना वाढू शकेल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. स्थावर संपत्ती विषयक व्यवहार आज टाळणे हितावह राहील. आईच्या प्रकृतीकडं विशेष लक्ष द्यावं लागेल.

▪️कन्या :

आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज निर्णय घेण्यात त्रास होण्याची शक्यता असल्यानं नवीन कामाची सुरूवात आपण यशस्वीपणे करू शकणार नाही. आज मतभेद होण्याची शक्यता असल्यानं शक्यतो मौन पाळावं. शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सामान्य राहील. दुपार नंतर वातावरण एकदम पालटेल. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा करून योग्य ते निर्णय घेऊ शकाल. एखाद्या सहलीचा बेत ठरवू शकाल. आज केलेली गुंतवणूक लाभदायी राहील. नशिबाची साथ मिळेल.

▪️तूळ :

आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज दिवसाच्या प्रारंभी आपले विचार दृढ आणि समतोल असतील. शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडं लक्ष द्यावं लागेल. नवी वस्त्रे आणि अलंकार यावर जास्त खर्च होईल. दुपार नंतर आपली मानसिकता बदलेल. कुटुंबीयांशी मतभेद होतील. महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील. आपला अहंकार जपण्यापेक्षा इतरांकडं लक्ष देऊन त्यांच्याशी समझोता करणं रास्त ठरेल.

▪️वृश्चिक :

आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपल्या मनाला शांतता लाभेल. मनात येणार्‍या नकारात्मक विचारांवर नियंत्रण ठेवावे लागेल. कोर्ट- कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शकयता आहे. दुपार नंतर कार्यपूर्ती दृष्टिक्षेपात येईल. शारीरिक व मानसिक स्वस्थता जाणवेल. आत्मविश्वास वाढेल. मनोरंजनासाठी पैसा खर्च कराल.

▪️धनू :

आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. प्राप्तीत वाढ संभवते. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यानं मन प्रसन्न होईल. मान- सन्मान आणि प्राप्तीत वाढ होईल. व्यापारात लाभ संभवतो. अपघाताची शक्यता आहे. शारीरिक स्वास्थ्य बिघडण्याची शक्यता आहे. प्राप्तीच्या मानाने खर्च अधिक होईल. वाद होण्याच्या शक्यतेमुळं वाणी संयमित ठेवा.

▪️मकर :

आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस स्थावर संपत्तीच्या व्यवहारासाठी उत्तम आहे. व्यावसायिक क्षेत्रात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खुश होतील. बढती संभवते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. सामाजिक आणि आर्थिक क्षेत्रात लाभ होईल. मित्रांपासून सुद्धा लाभ संभवतो.

▪️कुंभ :

आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. संततीच्या आरोग्याची काळजी निर्माण होईल. दूरवरच्या प्रवासाची योजना आखू शकाल. दुपार नंतर व्यवसायातील वातावरण अनुकूल होईल. वैवाहिक जीवनाचा आनंद उपभोगू शकाल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामिरीवर खुश होतील. पदोन्नती संभवते.

▪️मीन :

आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज वाद होण्याची शक्यता असल्यानं आपल्या वाणी आणि क्रोधावर नियंत्रण ठेवावं लागेल. गूढ विद्येचे आकर्षण होईल. सुखदायी बाबींत गोडी वाटेल. गहन चिंतन मनाला शांती देईल. दुपारनंतर अनुकूलता लाभेल. बौद्धिक दृष्टया लेखन कार्यात सहभागी व्हाल. एखादी आनंददायी बातमी मिळेल. व्यवसायात सावध राहावंं लागेल. नोकरीत वरिष्ठांशी वाद संभवतात.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page