दिनांक 12 मार्च 2024 जाणून घेऊया आजच्या राशीभविष्य मधून ‘या’ राशींच्या व्यक्तींची मैत्रिणींशी होईल भेट, हा होईल लाभ; वाचा राशी भविष्य….

Spread the love

ग्रह-नक्षत्र यांच्या स्थितीत होत असलेल्या बदलचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या जीवनावर पडत असतो. ज्या वेळी ग्रहांचा हा प्रभाव शुभ असतो तेव्हा व्यक्तीची जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रगती होते. कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण या राशी भविष्यात जाणून घेणार आहोत.

▪️मेष :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आज आपल्या विचारांची अस्थिरता आपणास अडचणीत आणेल. नोकरी-व्यवसायाच्या क्षेत्रात स्पर्धात्मक वातावरण राहील, ज्यातून बाहेर पडण्यात आपण यशस्वी व्हाल. नवी कामे करायला प्रेरीत व्हाल. लहान प्रवासाची शक्यता आहे. बौद्धिक किंवा लेखन कार्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज शक्यतो महत्वाचा निर्णय घेऊ नये.

▪️वृषभ :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आज आपल्या मनाची द्विधा अवस्था आपणास ठाम निर्णय घेऊ देणार नाही. त्यामुळं हाती आलेल्या संधीला मुकावं लागेल. फसव्या व्यवहारामुळं संघर्ष होण्याची शक्यता आहे. लेखक, कारागीर, कलावंत यांना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल. आज आपल्या वाक्चातुर्यानं आपण यशस्वी व्हाल आणि त्याचा इतरांवर सुद्धा प्रभाव होईल. आजचा दिवस नवीन कामाला सुरूवात करण्यासाठी अनुकूल नाही.

▪️मिथुन :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. सकाळपासूनच उत्साह आणि प्रसन्नता अनुभवाल. मित्र आणि नातलग यांच्यासह उत्तम भोजनाचा लाभ घ्याल. आर्थिक लाभ होईल आणि त्याचबरोबर भेटवस्तूही मिळतील. त्यामुळं दिवस खूप खुशीत जाईल. आज आपण सर्वांसह एखादा आनंददायक प्रवास ठरवण्याची सुद्धा शक्यता आहे. दांपत्य जीवनात सुसंवाद राहील.

▪️कर्क :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज आपणास खिन्नता आणि भीतीचा अनुभव येईल. कुटुंबात मतभेद झाल्यानं कौटुंबिक वातावरण तणावपूर्ण असेल. मन द्विधा झाल्यानं आपण बेचैन व्हाल. बोलण्यावर ताबा ठेवा नाहीतर मतभेद होऊ शकतात. स्वास्थ्याकडं लक्ष द्या. आज खूपच खर्च होईल. गैरसमज आणि मानहानी संभवते. मनास शांती मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

▪️सिंह :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आज आपणास विविध प्रकारे लाभ होऊ शकतात. अशावेळी थोडे गाफील राहिलात तर लाभापासून वंचित होऊ शकता, म्हणून तिकडं लक्ष द्यावं. मित्र मंडळ, स्त्रीवर्ग आणि थोरामोठयांकडून लाभ होतील. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. पित्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील.

▪️कन्या :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस नवीन काम सुरू करण्यास किंवा नवीन योजना अंमलात आणण्यास अनुकूल आहे. व्यापारात लाभ होईल. जुने येणे वसूल होईल. नोकरीत पदोन्नती संभवते. पितृघराण्याकडून लाभ होईल. कुटुंबात आनंदाचं वातावरण राहील. कुटुंबात एकोपा असेल. सरकारी कामे पूर्ण होतील. दिवस स्वस्थतेत जाईल.

▪️तूळ :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण दूरचा प्रवास करण्याची शक्यता आहे. परदेशी प्रवासास अनुकूलता राहील. तरी सुद्धा संतती आणि स्वास्थ्य यासंबंधी चिंता लागून राहील. नोकरीत वरिष्ठ किंवा सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळणार नाही. विरोधी किंवा प्रतिस्पर्धी ह्यांच्याशी शक्यतो कोणतीही चर्चा करू नका. पैसा खर्च होईल.

▪️वृश्चिक :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस सावधपणे व्यतीत करावा लागेल. नवे कार्य सुरू करू नका. क्रोध आणि अवैध आचरण आपणास अडचणीत टाकू शकतील. वेळेवर भोजन मिळणार नाही. राजकीय अपप्रवृत्ती पासून दूर राहावं. नवीन संबंध विकसित करू नयेत. एखादी दुर्घटना संभवते. मनास शांती लाभण्यासाठी प्रयत्नशील राहावे.

▪️धनू :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस बौद्धिक, तार्किक, विचार- विनिमय आणि लेखन कार्य यासाठी अनुकूल आहे. मनोरंजन, प्रवास, मित्रांचा सहवास,, सुंदर भोजन, वस्त्र प्रावरणे, भिन्नलिंगी व्यक्तीशी जवळीक इत्यादींमुळं आजचा दिवस आनंदात जाईल. भागीदारीत फायदा होईल. वैवाहिक जोडीदाराशी संबंध दृढ होतील. सार्वजनिक मान-सन्मान वाढेल.

▪️मकर :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आज आपले स्वास्थ्य उत्तम राहील. यश, कीर्ती आणि आनंद प्राप्ती होईल. कुटुंबीयांसह आनंदात दिवस जाईल. व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल. धनलाभ होईल. प्रतिस्पर्ध्याला नामोहरम कराल. सहकार्‍यांचं चांगलं सहकार्य मिळेल. कायदेशीर बाबीत आज लक्ष न घातलेले बरे.

▪️कुंभ :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. वैचारिकदृष्टया गर्क राहिल्यानं कोणताही महत्वाचा निर्णय न घेणं हेच हितावह राहील. प्रवासात त्रास संभवतो. ठरलेली कामे पूर्ण न झाल्यानं खूप निराशा होईल. मन अशांत राहील. पोटदुखी सतावेल. संततीची प्रकृती किंवा अभ्यास ह्या बध्दल चिंता लागून राहील.

▪️मीन :

आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र चौथ्या भावात असणार आहे. आज उत्साह आणि स्फूर्ती यांचा अभाव राहील. आईची तब्येत खराब होऊ शकते. मित्र आणि नातेवाईक यांच्याबरोबर वाद-विवाद होईल. काही त्रास किंवा विरोधी परिस्थितीमुळं शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य खराब होऊ शकेल. कोर्ट-कचेरीची कागदपत्रे सावधानतेने करा, एखाद्या वेळेस मानहानीला ते कारण होईल. एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो. अपघाताची शक्यता असल्यानं जलाशयापासून दूर राहावे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page