*देवरुख-* संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत शृंगारपुर कार्यक्षेत्रातील शृंगारपुर नायरी कातुर्डी रस्त्यावरील नायरी फाटा ०.०० ते ०.१०० अंतर्गत रस्त्यालगतची संरक्षक भिंत बांधणे या कामाला विकास निधीची मागणी असून त्याकरिता उपोषण करण्यात आले असुन दिनांक १५ ऑगस्ट २०२४ पासून ग्रामपंचायतचे सरपंच विनोद उर्फ बाबू पवार व सहकारी यांनी साखळी उपोषण चालू आहे.
या उपोषणाची दखल शासकीय यंत्रणेने न घेतल्यामुळे २१ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तत्काळ विकास निधी मंजूर व्हावा अशी विनंती उपोषण कर्ते करणार असल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सदरच्या साखळी उपोषणाचा पुढचा टप्पा म्हणून दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रत्नागिरी जिल्हा दौऱ्यादरम्यान भेट घेऊन तत्काळ विकास निधी मंजूर करणे कामी विनंती करणेस सरपंच तथा काही उपोषणकर्ते सदस्य भेट घेणार आहोत. सदर कालावधीमध्ये मौजे शृंगारपुर ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी येथे दिनांक १५ ऑगस्ट २०२४ पासून सुरु असलेले साखळी उपोषण उर्वरित प्रतिनिधी यांच्या मार्फत सुरु ठेवण्यात येणार आहे. मुख्यमंत्री महोदय यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर भेटीसाठी उपस्थित असलेले सदस्य परत मौजे शृंगारपुर येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणात सहभागी होणार आहेत. हे उपोषण कामाला प्रशासकीय मंजुरीचे पत्र मिळेपर्यंत सुरु राहील, असे शृंगारपूर ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच विनोद पवार आणि सहकारी यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
साखळी उपोषण सुरू ठेवून दिनांक २१/८/२०२४ रोजी मुख्यमंत्री शिंदे यांची सरपंच दौऱ्या दरम्यान प्रत्यक्ष भेट घेणार असून परिस्थितीची जाणीव करून देणार असून त्यानंतर साखळी उपोषणाला आमरण उपोषणाचे स्वरूप देणार आहेत . मग होणाऱ्या परीणामास सरकार जबाबदार राहतील. वैद्यकीय अधिकारी यांनी उपोषण दरम्यान आपले शुगर प्रमाण वाढले असून ते शारीरिक दृष्ट्या आपणास धोकादायक असल्याबाबत सांगितले आहे .