रत्नागिरी- राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री तथा पालघर व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण हे जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
बुधवार दि. 21 ऑगस्ट रोजी सकाळी 8 वाजता कॉरपोरेट ॲव्हीएशन टर्मिनल, गेट क्रमांक-८, कलिना मुंबई येथून खाजगी विमानाने रत्नागिरीकडे प्रयाण.
सकाळी 9.30 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व राखीव.
सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री, उपममुख्यमंत्री (गृह), उपममुख्यमंत्री (वित्त) महोदयांसमवेत रत्नागिरी विमानतळाच्या नवीन प्रवासी टर्मिनल इमारतीच्या भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती.(स्थळ : रत्नागिरी विमानतळ )
सकाळी 11.30 वाजता शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी इमारतीचे नामकरण व लोकार्पण सोहळ्यास उपस्थिती. (स्थळ:- शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, रत्नागिरी)
दुपारी 12.30 वाजता महिला सशक्तिकरण अभियान (मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना) शुभारंभ कार्यक्रम उपस्थिती. (स्थळ:- चंपक मैदान, रत्नागिरी)
दुपारी 1 वाजता . रत्नागिरी विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी 1.15 वाजता रत्नागिरी विमानतळ येथे आगमन व खाजगी विमानाने (VT-CSP) नाशिक विमानतळाकडे
प्रयाण.