चिपळूण /प्रतिनिधी- चिपळूण शहरातील पवन तलाव मैदानाच्या धर्तीवर अलोरे येथील मैदान सुसज्ज होईल व येथील पंचक्रोशीतील खेळाडूंना चांगली संधी उपलब्ध होईल, असे प्रतिपादन आमदार शेखर निकम यांनी अलोरे येथील खेळाच्या मैदानाच्या भूमिपूजन प्रसंगी केले.
अलोरे येथील खेळाच्या मैदानाचे भूमिपूजन आमदार शेखर निकम यांच्यासह येथील प्रतिष्ठित ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते झाले. यावेळी आमदार निकम यांनी या खेळाच्या मैदानाच्या विकसित कामासाठी निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल येथील ग्रामस्थांतर्फे सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष रमेश राणे, युवक तालुकाध्यक्ष निलेश कदम, खेर्डीचे माजी सरपंच दशरथ दाभोळकर, जयंत शिंदे, महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ जागृती शिंदे, अलोरे शिरगाव चे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत पाटील यांच्यासह येथील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.