पुणे : चिपळूणमधील तरुणीवर प्रेमप्रकरण आणि पैशाच्या व्यवहारातून पुणे येथे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेने चिपळुणात पडसाद उमटले आहेत. शुभदा शंकर कोदारे (२८, मुळ चिपळूण, स्थायिक कराड, नोकरी निमित्त पुणे बालाजी नगर, कात्रज) असे खून करण्यात आलेल्या तरुणीचे नाव आहे. तर कृष्णा सत्यनारायण कनोजा (वय २८, रा. खैरैवाडी, शिवाजीनगर, मूळ यूपी) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला पोलिसांनी अटक केली. न्यायालयाने त्याला १३ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
घटना अशी की, शुभदा मूळची चिपळूण येथील असून तिचे वडील व्यवसाय निमित्ताने कराड येथे स्थायिक आहेत. ती नोकरीमुळे पाच वर्षांपासून पुण्यात राहत होती. 2022 विमाननगर येथील डब्लूएनएस कंपनीत काम करत असताना, कृष्णा आणि शुभदा या दोघांची ओळख झाली. कृष्णा हा लिपिक पदावर,, तर शुभदा एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होती. पुढे दोघांचा चांगला परिचय झाला. त्यातून प्रेम संबंध जुळले.
शुभदाने आपले वडील आजारी असल्याचे सांगून त्यांच्या उपचारांसाठी कृष्णा याच्याकडून वेळोवेळी ४ लाख रुपये घेतले. तिच्या सतत पैसे मागण्यामुळे कृष्णाला संशय आला. अडीच महिन्यांपूर्वी त्याने थेट कराड गाठून तिच्या वडिलांची भेट घेतली. त्यावेळी आपले पैसे शुभदाने वडिलांच्या उपचारांच्या नावाखाली खाल्ल्याचे समजले. तिचे खोटे बोलणे कृष्णाच्या जिव्हारी लागले. कृष्णाचीही परिस्थिती जेमतेमच आहे… आपण कष्टाने कमावलेले पैसे तिने खोटे बोलून आपल्याकडून घेतले, हे त्याच्या डोक्यात बसले होते. शुभदाचे खोटे बोलणे त्याच्या जिव्हारी लागले होते. त्यातूनच कृष्णा याने शुभदाला धडा शिकविण्याचे मनाशी ठरवले. कृष्णाच्या मनात शुभदाला जखमी करायचे होते. मंगळवारी येरडवा येथील डब्ल्यू एन एस कंपनीच्या पार्किंगमध्ये सायंकाळी 6 वाजता कृष्णा याने तिच्यावर सपासप वार केले. मात्र, वाद वाढल्याने रागाच्या भरात कृष्णाने जोरात ४-५ वार तिच्या हातावर केले. हे वार इतके जोरात होते की. त्यात शुभदाच्या हाताच्या नसा पूर्णपणे तुटल्या. त्याला तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला आणि कार्डियाक अटॅक येऊन तिचा मृत्यू झाला.
येरवडा परिसरातील रामवाडी येथील एका कंपनीच्या पार्किंगमध्ये उसन्या पैशांच्या वादातून तरुणीवर कोयत्याने वार करुन तिचा निर्घुण खुन करण्यात आला आहे.
शुभदा शंकर कोदारे Shubhada Shankar Kodare (वय २८, रा. बालाजीनगर, कात्रज) असे खुन झालेल्या तरुणीचे नाव आहे. येरवडा पोलिसांनी कृष्णा सत्यनारायण कनोजा Krishna Satyanarayan Kanoja (वय ३०, रा. खैरेवाडी, शिवाजीनगर) याला अटक केली आहे. कृष्णा याने शुभदा हिच्यावर इतका जोरात वार केला की त्यात तिचा उजवा हात तुटला. अतिरक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यु झाला. ही घटना रामवाडी येथील डब्ल्यु एन एस या बहुराष्ट्रीय आय टी कंपनीत (WNS Global Services in Pune) मंगळवारी सायंकाळी सव्वासहा वाजता घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभदा कोदारे ही तरुणी मुळची कराड येथे राहणारी आहे. ती रामवाडी येथील डब्ल्यु एन एस या बहुराष्ट्रीय कंपनीच्या कॉल सेंटरमध्ये अकाऊंटट म्हणून कामाला होती. तिच्याच विभागात कृष्णा कनोजा काम करत आहे. उसन्या पैशांवरुन त्यांच्यात वाद झाला होता. कंपनी सुटल्यानंतर ती कंपनीच्या पार्किंगमध्ये आली. त्याचवेळी कनोजा याने तिला गाठले. तिच्या उजव्या हातावर कोयत्याने वार केला. हा वार इतका जोरात होता की त्यात तिचा हातच तुटला. जखमी तरुणीला तातडीने येरवड्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने उपचार सुरु असताना तिचा मृत्यु झाला. येरवडा पोलिसांनी कृष्णा कनोजा याला अटक केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र शेळके (Sr PI Ravindra Shelke) तपास करीत आहेत.