संगमेश्वर/ अमोल शेट्ये- संगमेश्वर कसबा देवपाटवाडी येथे काल सकाळी सहा वाजता. बिबट्याने लहान वासरांची शिकार केली. संगमेश्वर पंचक्रोशी मध्ये बिबट्याचा मुक्त वावर आहे. आज मिळालेल्या माहितीनुसार राजाराम फाटक राहणार देवपटवाडी यांच्या गाईच्या लहान वासराची शिकार केली आहे. वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे पंचक्रोशी मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाकडून ग्रस्त घालण्याचे काम चालू आहे.
गोधनांचे नुकसान होत असल्याने नागरिक नाराज…
संगमेश्वर पंचक्रोशीत कुठे ना कुठे येऊन आपली दहशत पसरवत आहे. वारंवार होणाऱ्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गाईची वासराची तिकड झाल्याने आजूबाजूला गोपालक चिंतेत आहेत. लवकरात लवकर होणे बघा आणि कारवाई करावी अशी त्यांची मागणी आहे. शेतकरी लोकांचे गो धनाचे नूकसान करत असल्याने त्याचा वेळीच बंदोबस्त करायला पाहिजे.
मनुष्यहानी होण्याअगोदर बिबट्याचा बंदोबस्त करण्याची पंचक्रोशीतील नागरिकांची मागणी….
बिबट्याकडुन मनुष्यहानी होण्याआधी संबंधित विभागाने बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करून जेरबंद करावे व त्याला अभयारण्यात अथवा नैसर्गिक अधिवासात सोडून द्यावे. अशी मागणी पंचक्रोशीतील नागरिकांची आहे त्या संदर्भामध्ये सयांची मोहीम चालू असून लवकरच वनविभागाला निवेदन देण्यात येणार आहे. या सर्व बाबीसाठी वनविभागाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे नागरिकांचे तयारी आहे सर्व नागरिकांचे म्हणणे आहे असे चर्चेतून पुढे येत आहे.
वनविभागाकडून ग्रस्त घालण्याची काम चालू….
वनविभागात कडून ग्रस्त घालण्याचे काम चालू आहे तसेच पंचक्रोशी मध्ये फिरून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत. तसेच वाघाचा वावर बघून त्या संदर्भात लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचे वन विभागाकडून सांगण्यात आलेले आहे.