
डिजीटल दबाव वृत्त
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात शानदार पुनरागमन करत इंग्लंड संघाचा 106 धावांनी धुव्वा उडवून मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल यांची फलंदाजी आणि त्यानंतर जसप्रीत बुमराहच्या घातक गोलंदाजीचा भारताच्या विजयात मोठा वाटा होता. या विजयासह रोहित शर्माने एमएस धोनीचा मोठा विक्रमही मोडला आहे.
भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकलेले खेळाडू
- 313 – विराट कोहली
- 307 – सचिन तेंडुलकर
- 296 – रोहित शर्मा
- 295 – एमएस धोनी
- 227 – युवराज सिंग
- 216– राहुल द्रविड
कर्णधार रोहित शर्माने भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकलेल्या खेळाडूंच्या यादीत एमएस धोनीला मागे टाकले आहे. या विजयानंतर रोहित शर्मा भारतासाठी 296 व्या विजयी सामन्याचा भाग बनला, त्याने भारतासाठी 295 सामने जिंकलेल्या एमएस धोनीला मागे टाकले. आता रोहित या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला आहे, तर धोनी चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. सचिन तेंडुलकरच्या खालोखाल विराट कोहली भारतासाठी सर्वाधिक सामने जिंकणारा आहे.
भारतीय संघाने दुसऱ्या डावात इंग्लंडला विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य दिले होते, मात्र दुसऱ्या डावात पाहुण्या संघ 292 धावांवर बाद झाला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात इंग्लंडकडून सर्वात जास्त धावा जॅक क्रॉलीने (73) केल्या, तर भारतासाठी दुसऱ्या डावात अश्विनने 3 तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या. मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना दुसऱ्या डावात प्रत्येकी एक यश मिळाले. पहिल्या डावात बुमराहने भारताकडून सर्वाधिक 6 विकेट घेतल्या.
जाहिरात

