
डिजीटल दबाव वृत्त
झारखंडमध्ये मागील काही दिवसांपासून राजकीय गदारोळ सुरू आहे. झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीने अटक केल्यानंतर राजकीय संकट उभं ठाकलं होतं. यानंतर चंपई सोरेन यांच्याकडे पक्षाने मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर आज चंपई सोरेन यांना बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले. या परीक्षेच सोरेन सरकार पास झालं आहे.
चंपाई सोरेन यांच्या नेतृत्वातील सरकारने आज झालेली बहुमत चाचणी जिंकली आहे. आज झालेल्या बहुमत चाचणी दरम्यान सोरेन यांच्या सरकारच्या बाजूने ४७ मतं पडली असून २९ मतं विरोधात पडली आहेत.

या फ्लोर टेस्टपूर्वी आमदार फुटण्याचा धोका लक्षात घेऊन सोरेन सरकारमधील आमदारांना हैदराबादमध्ये हालवण्यात आले होते. अखेर काल संध्याकाळी सर्व आमदार रांची येथे परतले होते. झारखंडमध्ये ऑपरेशन लोटसचा धोका देखील व्यक्त केला जात होता. मात्र यावेळी झारखंडमध्ये भाजपला यश मिळालेलं नाहीये.
ऐकूण संथ्याबळ किती.
झारखंड विधानसभेत एकूण ८१ जागा आहेत. त्यामध्ये बहुमतासाठी ४१ सदस्यांचं संख्याबळ आवश्यक होतं. JMMच्या नेतृत्वाखालील युतीकडे ४८ आमदाराचं पक्कं बहुमत होतं. यामध्ये JMM चे २९, काँग्रेसचे १७, RJD आणि CPI(ML) यांच्या प्रत्येकी एक सदस्यांचा समावेश आहे. यापैकी सरकारच्या बाजूने ४७ मते पडली आहेत.


