![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/10/Screenshot_2023_1019_095306-1.jpg)
मागील काही दिवसापासून कळवा, मुंब्रा, दिवा या भागात महापालिकेकडून अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जात आहे.
दबाव वृत्त : मुंब्रा येथील कौसा भागात शासकीय जमीनींवर उभ्या राहिलेल्या पाच अनधिकृत इमारतींवर सोमवार पासून ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून ठाणे महापालिकेकडून कळवा, मुंब्रा, दिवा भागात कारवाई केली आहे.
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20230403-WA0000-11.jpg)
ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश साहाय्यक आयुक्तांना दिले आहेत. त्यानुसार मागील काही दिवसापासून कळवा, मुंब्रा, दिवा या भागात महापालिकेकडून अनधिकृत इमारतींवर कारवाई केली जात आहे. सोमवारी कौसा येथील खान कपाऊंड मध्ये शासकीय जागेत उभारण्यात आलेल्या तळ अधिक तीन मजल्याच्या पाच इमारतींवर ठाणे महानगर पालिकेने आणि जिल्हा प्रशासनाने संयुक्त तोडक कारवाई केली.
जाहिरात
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231019-WA0004-1.jpg)
![](https://janshaktichadabav.com/wp-content/uploads/2023/10/IMG-20231015-WA0043-3-300x300.jpg)