मुंबई: मुंबई परप्रांतीयांच्या घशात जाऊ नये म्हणून, मुंबईत वाढत असलेल्या अमराठी नगरसेवक संख्येला रोखण्यासाठी मुंबईसह महाराष्ट्र वाचवा कृती समिती स्थापना केली असून संघटनेचे कार्याध्यक्ष श्री रविंद्र कुवेस्कर यांच्या मुख्य संयोजना अंतर्गत रवींद्र शिंदे आणि उदय जागुष्टे यांच्यावर ही जबाबदारी सोपविली आहे.
रविवार दिनांक १५ ऑक्टोबर रोजी वडाळा पश्चिम येथे मोहीम घेण्यात आली यावेळी असंख्य मराठी बांधवांनी मोहिमेमध्ये सामील होऊन “पक्ष कोणताही असो- आमचा उमेदवार मराठीच पाहिजे” या मागणीला सही करून उत्तम प्रतिसाद दिला.
अशा जनजागृती आणि जनप्रबोधनाच्या मोहिमा मुंबईच्या गल्लीबोळात होण्यासाठी कृती समितीला सहकार्य करावे असे आवाहन समितीचे मुख्य संयोजक श्री रवींद्र कुवेस्कर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सोबतच्या क्रमांकावर संपर्क करावा. ९३२०७२८५३९ / ७०४५७६३३७६
जाहिरात