आजचे राशिभविष्य : आज सोमवार वृषभ,कन्या राशींना मिळेल कामात पदोन्नती; तर ‘या’ राशींना होणार मोठा आर्थिक लाभ, वाचा राशीभविष्य…

Spread the love

आज 9 डिसेंबर सोमवार कोणत्या राशीचं दैनंदिन जीवन राहील चांगलं, जोडीदाराची कोणाला मिळेल साथ, आजचं राशीभविष्य कसं असेल, जाणून घेऊ आजच्या राशीभविष्यात.

▪️मेष (ARIES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून लाभात आहे. आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल. सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल. व्यापारात लाभ होईल. विवाहाची बोलणी करण्याच्या दृष्टीनं विवाहेच्छुकांना यश मिळेल. दुपारनंतर मात्र प्रकृती बिघडू शकते. आज गुंतवणूक करताना खूप विचार करावा लागेल. कौटुंबिक विरोध संभवतो. सबब मौन पाळणे सर्वोत्तम. इतरांच्या समस्या सोडविण्याच्या प्रयत्नात आपण स्वतःच अडकून पडण्याची शक्यता आहे. अपघाताच्या शक्यतेमुळं वाहन चालवताना काळजी घ्यावी.

▪️वृषभ (TAURUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दशम भावात आहे. आज सर्व प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्तता मिळू शकेल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख- समाधान लाभेल. व्यापार-व्यवसायात यश मिळवू शकाल. आपल्या कामगिरीचं कौतुक होऊन वरिष्ठ आपणांवर खुश होतील. दुपारनंतर नवीन कामाचं यशस्वी नियोजन करू शकाल. व्यापारात फायदा होईल. पत्नी आणि संततीकडून लाभ होईल. सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.

▪️मिथुन (GEMINI) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून भाग्यात आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. प्रकृतीत चढ-उतार येतील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठ आपल्या कामगिरीवर नाखूष झाल्यानं आपणास मानसिक त्रास होईल. खर्च वाढेल. संततीची काळजी राहील. दुपारनंतर कार्यातील यश दृष्टिक्षेपात आल्यानं मनाला आनंद वाटेल. व्यापारातील वातावरण आपणास अनुकूल होईल. वडीलधार्यांच्या आशीर्वादानं तुमचं कार्य तडीला जाईल. नोकरीत बढती संभवते आणि धन मिळेल.

▪️कर्क (CANCER) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून अष्टम भावात आहे. आज मन अशांत आणि निरुत्साही राहील. रागावर नियंत्रण ठेवावं लागेल. अवैध कृत्ये आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहावं लागेल. पैशांची चणचण भासेल. दुपारनंतर मात्र प्रकृती चांगली राहिल्यानं मनःस्वास्थ्य मिळेल. आनंदप्राप्तीसाठी खर्च होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद संभवतात. परदेशस्थ नातेवाईकांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. एखाद्याशी वाद आणि मतभेद होण्याची शक्यता आहे.

▪️सिंह (LEO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सातव्या भावात आहे. आज आपणास मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध होतील. मित्र आणि स्नेहीजनांसह आनंद लुटाल. सहलीस जाऊ शकाल. दुपारनंतर मात्र अती विचार केल्यामुळं मानसिक थकवा जाणवेल. संतापामुळं कार्ये बिघडतील, पण बोलण्यावर संयम ठेवून परिस्थिति हाताळू शकाल. पैशाची चणचण भासेल.

▪️कन्या (VIRGO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून सहाव्या भावात आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कार्यात यश मिळाल्यानं खुश राहाल. यश आणि प्रसिद्धी वाढेल. कौटुंबिक वातावरण अनुकूल राहील. त्यामुळं शारीरिक आणि मानसिकदृष्टया आपण तरतरीत आणि प्रफुल्लित राहाल. भावनेच्या भरात आपण वाहवत जाण्याची शक्यता आहे. दुपारनंतर दिवस आनंदात जाईल. व्यापारात भागीदारांकडून लाभ होतील.

▪️तूळ (LIBRA) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून पाचव्या भावात आहे. लेखनकार्य करण्यास आजचा दिवस शुभ आहे. बौद्धिक चर्चेतून लाभ संभवतात. कीर्ती वाढेल. आज जास्त भावनावश व्हाल. कामाच्या ठिकाणी वातावरण अनुकूल राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील.

▪️वृश्चिक (SCORPIO) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून चौथ्या भावात आहे. आज हट्ट सोडणे हितावह राहील. आज आपण भावनेच्या आहारी जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं मानसिक ताण वाढेल. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. वैभवी वस्त्र, दागिणे आणि सौंदर्य प्रसाधने यावर खर्च होईल. आईकडून लाभ होईल. दुपारनंतर विचारात एकदम बदल होईल. नवीन कामात अडचणी येतील. बौद्धिक आणि तार्किक कामे करू शकाल. पोटाच्या तक्रारी संभवतात. प्रवासात त्रास होण्याची शक्यता आहे.

▪️धनू (SAGITTARIUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून तिसऱ्या भावात आहे. आज मन उत्साहित राहील. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्य निर्णय घेऊ शकाल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नशिबाची साथ मिळेल. दुपारनंतर मात्र आपण अधिक संवेदनशील व्हाल. मानसिक ताण राहील. स्त्री वर्गाचा प्रसाधनांवर खर्च होईल. घर, जमीन, वाहन इत्यादींच्या व्यवहारात फसवणूक संभवते. विद्यार्थ्यांना ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिनं आजचा दिवस अनुकूल आहे.

▪️मकर (CAPRICORN) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून दुसऱ्या भावात आहे. आज एखाद्या मंगल कार्यासाठी आपणास खर्च करावा लागेल. वाद-विवादामुळं कौटुंबिक वातावरण गढुळ होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांचे मन दुखावेल व ते आपल्यावर नाराज होतील. दुपार नंतर मनातील चिंता दूर होतील. मित्र व स्वजनांच्या भेटीने मन आनंदी होईल. नशिबाची साथ लाभेल. भावंडांच्या प्रेमाचा आपल्यावर वर्षाव होईल.

▪️कुंभ (AQUARIUS) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून प्रथम भावात असेल. आज प्रापंचिक गोष्टीं ऐवजी गूढ विषयांकडे आपला जास्त कल होईल. नकारात्मक विचार काढून मानसिक स्वास्थ्य मिळविण्याचा प्रयत्न करा. शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता दिवसभर राहील. दुपारनंतर एखाद्या धार्मिक कार्याकडं आकर्षित व्हाल. विद्यार्थ्यांना लेखन- वाचनात अनुकूलता लाभेल. वैवाहिक जीवन शांततामय असेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे.

▪️मीन (PISCES) : चंद्र आज कुंभ राशीत आहे. तो आपल्या राशीपासून बाराव्या भावात आहे. आज आर्थिक देवाण-घेवाण, वसुली, थकबाकी इत्यादी कार्यात आणि गुंतवणूक करताना सावध राहावं लागेल. इतरांच्या कामांत व्यत्यय आणू नका. कोर्ट-कचेरी प्रकरणात सावध राहावं लागेल. वाणी आणि संतापावर नियंत्रण ठेवावं लागेल. एखादा अपघात संभवतो. दुपारनंतर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य सुधारेल. धार्मिक कार्यात मन गुंतेल. मित्रांकडून भेट वस्तू मिळतील. घरगुती वातावरण आनंदाचं राहील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page