कोकण विभागात प्रथम आलेल्या संगमेश्वर पंचायत समितीला पुरस्कार प्रदान…

Spread the love

तत्कालीन पंचायत समिती सभापती जया माने आणि गटविकास अधिकारी भारत चौगुले यांनी स्वीकारला पुरस्कार

देवरूख- संपूर्ण कोकण विभागात प्रथम आलेल्या संगमेश्वर पंचायत समितीला कोकण भवन येथे विभागीय आयुक्तांच्या हस्ते प्रथम क्रमांकाचे बक्षीस प्रदान करण्यात आले आहे.

संगमेश्वर पंचायत समितीच्या कार्याचा आढावा घेत केलेल्या आदर्श कामामुळे हा पुरस्कार प्राप्त झाला. ११ लाख रुपये आणि प्रशस्तीपत्रक अशा स्वरूपाचे हे बक्षीस प्रदान करण्यात आले. यावेळी संगमेश्वर तत्कालीन सभापती जया माने, बिडीओ भारत चौगुले, पंचायती समितीचे अधिकारी हा पुरस्कार स्वीकारताना उपस्थित होते.हा पुरस्कार मिळाल्याने आनंद झाल्याचे माजी सभापती जया माने यांनी सांगितले. याचे श्रेय माझ्यासोबत त्यावेळी काम करणारे सर्व पंचायत समिती सदस्य, अधिकारी व कर्मचारी वर्ग यांचे असल्याचे सांगितले. त्याचबरोबर बीडीओ भारत चौगुले म्हणाले की, या पुढे देखील आपल्या पंचायत समितीचा यशाचा आलेख अशाच पद्धतीने वाढता राहील. त्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी मेहनत घेतील.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page