देवरुख केंद्रात ८४५ विद्यार्थी देत आहेत बारावी परीक्षा

Spread the love

देवरुख | फेब्रुवारी २५, २०२३.

फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये होत असलेल्या बारावी परीक्षेची बैठक व्यवस्था देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय आणि न्यू इंग्लिश स्कूल, देवरुखच्या इमारतीमध्ये करण्यात आली असून या परीक्षेला मंगळवार दिनांक २१ फेब्रुवारी पासून इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरुवात झाली आहे.

बारावी परीक्षेला देवरुख केंद्रातून एकूण ८४५ विद्यार्थी प्रविष्ट झाले आहेत. यामध्ये कला शाखेतील २२८, वाणिज्य शाखेतील ३००, विज्ञान शाखेतील २८१, तर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे ३६ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.

आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालय इमारत तळमजला व वरचा मजला- विज्ञान शाखा: डब्ल्यू ००३८७० ते डब्ल्यू ००३८७५ (६ विद्यार्थी), कला शाखा: डब्ल्यू ०११२१२ ते डब्ल्यू ०११४३९ (२२८ विद्यार्थी), वाणिज्य शाखा: डब्ल्यू ०१८७६८ ते डब्ल्यू ०१९००८ (२४१ विद्यार्थी).

न्यू इंग्लिश स्कूल, देवरुख इमारत- वाणिज्य शाखा: डब्ल्यू ०१९००९ ते डब्ल्यू ०१९०६७ (५९ विद्यार्थी), व्यावसायिक अभ्यासक्रम: डब्ल्यू ०२५४९० ते डब्ल्यू ०२५५२५ (३६ विद्यार्थी), विज्ञान शाखा: डब्ल्यू ००३५९५ ते डब्ल्यू ००३८६९ (२७५ विद्यार्थी)
संपूर्ण परीक्षा निकोप व शांततेच्या वातावरणात पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांच्या मार्गदर्शनानुसार केंद्र संचालक प्रा. एम. आर. लुंगसे, केंद्र उपसंचालक प्रा. धनंजय दळवी आणि प्रा. संजय कुलकर्णी मेहनत घेत आहेत. कोकण बोर्डाने कळविलेल्या वेळापत्रकानुसार परीक्षेचे सकाळच्या सत्राचे पेपर १०:३० वाजता तर दुपारच्या सत्राचे पेपर ०२:३० वाजता सुरू होण्यापूर्वी सर्व परीक्षार्थींनी परीक्षागृहात प्रवेश करावा, प्रत्यक्ष परीक्षा सुरू झाल्यानंतर परीक्षार्थींना परीक्षा दालनात प्रवेश दिला जाणार नाही याबाबत सूचना दिल्या असून सदर सूचनांचे पालन काटेकोरपणे करून घेतले जात आहे. त्याचप्रमाणे या परीक्षेमध्ये प्रत्येक विषयाच्या पेपरची बैठक व्यवस्था बदलती राहणार असल्याने परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी याबाबत सतर्क राहण्याचे आवाहन केंद्र संचालक प्रा. एम. आर. लुंगसे यांनी केले आहे. सर्व परीक्षार्थी विद्यार्थ्यांना देवरुख शिक्षण प्रसारक मंडळ व महाविद्यालयाच्यावतीने परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page