डी.एड., बी.एड. शिक्षकांना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून फसवणूक…

Spread the love

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उपाध्यक्षा शैलजा दराडेंवर हडपसर पोलीस ठाण्यात अखेरीस गुन्हा दाखल.

मुंबई | फेब्रुवारी २५, २०२३.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शिक्षकांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शैलजा दराडे या शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना २०१९ साली राज्यातील ४५ शिक्षकांकडून प्रत्येकी १२ ते १४ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. याप्रकरणी त्यांच्यासह त्यांच्या भावावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डी.एड. झालेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी नोकरी लावण्यासाठी १२ लाख तर बी.एड. झालेल्या शिक्षकांकडून १४ लाख रुपये शैलजा दराडे या त्यांचा भाऊ दादासाहेब दराडेमार्फत घेत होत्या. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील शिक्षक श्री. पोपट सूर्यवंशी यांनी याबाबत पुण्यातील हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोपट सूर्यवंशी यांच्या नात्यातील दोन महिला शिक्षकांना नोकरी लावण्यासाठी प्रत्येकी १४ आणि १२ लाख रुपये दादासाहेब दराडे याने घेतले होते. दोन भरती प्रक्रिया पार पडल्यानंतर देखील नोकरी न मिळाल्याने श्री. सूर्यवंशी यांनी आपले पैसे परत मागितले. मात्र दादासाहेब आणि शैलजा दराडे यांनी पैसे परत देण्यासाठी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे श्री. सूर्यवंशी यांनी नाईलाजाने न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणात गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे आदेश दिले. शैलजा यांनी मात्र त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याचे कारनामे समजल्यानंतर भावाशी असणारे संबंध तोडून टाकले असल्याचे सांगितले.

फिर्यादीला दिली उडवाउडवीची उत्तरे…

कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून शिक्षकांकडून पैसे मागितले होते मात्र शिक्षकांना नोकर न मिळाल्याने त्यांनी याबाबत विचारपूस करण्यास सुरुवात केली. त्यावेळी आरोपी म्हणजेच शैलजा दराडे आणि त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे शिक्षकांनी आपले पैसे परत मागण्यासाठी वारंवार फोन केले. त्यानंतरही त्यांनी शिक्षकांना त्यांचे पैसे परत केले नाहीत. तरीदेखील शिक्षकांनी काही दिवस फोन करून पैसे परत मागण्याचा प्रयत्न सातत्याने केला. तरीही पैसे परत मिळाले नाहीत.

फसवणूक झाल्याचे कळताच पोलिसांत धाव…

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्री. पोपट सूर्यवंशी आणि अन्य शिक्षकांनी पोलिसांत धाव घेतली. घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगतला. पोलिसांनी त्यानुसार कारवाई सुरु केली आहे. त्यांनी शैलजा दराडे आणि त्यांचे भाऊ दादासाहेब दराडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page