५ लाखापर्यंत आता महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजनाचा लाभ मिळणार आणि विशेष म्हणजे सर्वच रेशन कार्ड धारकांना सरकारने समाविष्ट करून घेतले आहे.

Spread the love

🔸 महाराष्ट्रातील सर्वच आर्थिक स्तरातील नागरिकांसाठी नव्याने विस्तारीत महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना लागू.

🔸 सर्वच म्हणजे केशरी रेशनकार्ड धारकासह अगदी पांढऱ्या रेशन कार्डधारकांनासुद्धा पाच लाखापर्यंतचे उपचार यामध्ये मोफत मिळणार.

🔸 या योजनेच्या माध्यमातून अगदी छोट्या-छोट्या आजार-विकारापासून ते मोठमोठ्या आजार-विकारांपर्यंत अगदी सरकारी दवाखान्यामधून मिळणारे उपचार सुद्धा खाजगी दवाखान्यामधून मोफत मिळणार.

🔸 युनायटेड इन्शुरन्स कंपनीच्या सहयोगातून राज्यांमध्ये सुरू झालेली ही योजना पंधराशे कोटी रुपयांची आहे.

🔸 महात्मा फुले जीवनदायी योजनेचा पुन्हा विस्तार केलेला आहे. सर्वच आजार समाविष्ट असलेल्या या नव्या आणि विस्तारित योजनेचा फायदा राज्यातील सर्वच नागरिकांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

🔸 योजनेंतर्गत विविध आजारांवरील सरकार आणि इन्शुरन्स कंपनीने ठरवलेले दर आहेत त्यानुसारच आकारणी.

🔸 मुंबईमध्ये या सेवा-कॅन्सर, मेंदू, मणका, किडनी, लिव्हर किंवा असे जे महाभयानक रोग आहेत, त्या रुग्णांना फार मोठा आधार या उपचारांचा. या विस्तारित महात्मा फुले जीवनदायी योजनेचा लाभ घेऊ घ्या.

🔸 ज्या रुग्णांना ताप,सर्दी,खोकला किंवा कोरोनाची लक्षणे आहेत ते रुग्ण सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी जातील.

🔸 बाकीच्या सर्व आजारांवर डॉक्टरांनी कुणालाही सेवा नाकारू नये. या योजनेंतर्गत सर्व ते उपचार करावेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page