देवरुख सोळजाई मंदिर जीर्णोद्धाराचा आठवा वर्धापनदिन सोहळा १० व ११ फेब्रुवारी रोजी साजरा होणार..

Spread the love

जनशक्तीचा दबाव न्यूज | फेब्रुवारी ०३, २०२३.

देवरुख | प्रमोद हर्डीकर

नवसाला पावणार्‍या ग्रामदेवी श्री देवी सोळजाईच्या मंदिर जीर्णोद्धाराचा आठवा वर्धापनदिन सोहळा १० व ११ फेब्रुवारीला विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

🔸 शुक्रवार, दि. १० फेब्रुवारी, २०२३.

▪️ सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत महाकाली यज्ञ.
▪️ ११:०० ते ०१:०० सोळजाई भक्तांचा हवन कार्यक्रम.
▪️ ०१:०० ते ०३:०० या वेळेत सर्वांसाठी महाप्रसाद होणार आहे.

🔸 शनिवार, दि. ११ फेब्रुवारी, २०२३.

▪️ सकाळी ०८:३० ते १२:३० या वेळेत ग्रामदेवता श्री देवी सोळजाई देवीच्या प्रतिमेची रथातुन मिरवणुक काढण्यात येणार आहे. संपुर्ण शहरातुन ही मिरवणुक काढण्यात येणार आहे.
▪️ सर्व भाविक या मिरवणुकीत सहभागी होणार आहेत.
▪️ दुपारी महाप्रसाद
▪️ रात्री देवरुख कुंभारवाडीचे नमन होणार आहे.

🔸 दोन दिवसांच्या या सोहळ्याच्या नियोजनासाठी देवस्थानकडून वाडीवार सभा व बैठका होत आहेत.

▪️ प्रसाद वाटपाचे व मिरवणुक सहभागाचे नियोजन केले जात आहे. सुमारे दहा हजारांहून अधिक भाविक सहभागी होणार आहेत.

▪️ देवरुख शहराबरोबर इतर अनेक शहरांतील भाविक या कार्यक्रमासाठी देवरुख नगरीत दाखल होणार आहेत.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page