अमरावतीमध्ये सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि मिनी बस यांच्यात भीषण अपघात; क्रिकेट मॅच खेळण्यासाठी निघालेल्या ४ तरूणांचा मृत्यू; १० जण जखमी…

Spread the love

अमरावती- अमरावतीमध्ये सिमेंट काँक्रिट मिक्सर आणि मिनी बसमध्ये झालेल्या भीषण अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आहे. १० जण जखमी झाले आहेत. अमरावतीतील नांदगाव-खंडेश्वर रोडवर हा भीषण अपघात झाला आहे.

यवतमाळ येथे क्रिकेट मॅच खेळण्यासाठी १४ तरुण अमरावतीहून यवतमाळसाठी निघाले होते. मात्र वाटेतच नांदगाव-खंडेश्वरजवळ शिंगणापूरजवळ हा अपघात झाला. यामध्ये ४ तरुणांचा मृत्यू झाला तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमी तरूणांना नांदगाव खंडेश्वर येथील तालुका आरोग्य केंद्र येथे प्राथमिक उपचारासाठी दाखल केले असून तेथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. तर काही गंभीर जखमींना अमरावती येथे पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page