१२ जानेवारीला ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन
देवरुख- संगमेश्वर तालुक्यातील आंगवली येथील आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर देवालयाचा यात्रौत्सव सोहळा दि. १२, १३ जानेवारीला विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.
दि. १२ जानेवारीला सकाळी १० वाजता वरद शंकराची पूजा, दुपारी ३.४५ वाजता ध्वजारोहण, सायंकाळी ४ ते ६ श्री मार्लेश्वर देव-देवतांना हळद लावण्यात येईल. सायंकाळी ६ ते ८ या वेळेत खेळ पैठणीचा, सायंकाळी ७ वाजता दीपोत्सव, रात्री ८ ते ९ महाप्रसाद, रात्री ९ वाजता ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दि. १३ जानेवारीला दुपारी ३ वाजल्यापासून विविध मानांच्या पालख्या, दिंड्यांचे आंगवली येथील श्री मार्लेश्वर मंदिरात आगमन होईल. सायंकाळी ५.३० ते ७.३० या वेळेत खेळ पैठणीचा भाग-२ आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ७.३० ते ९ या वेळेत श्री देव मार्लेश्वर विवाह सोहोळ्यात जाण्यापूर्वीचे सर्व विधी मंदिरात होतील. रात्री ११.३० वाजता श्री देव मार्लेश्वर, चि. सौ. का. गिरिजादेवी यांच्या कल्याणविधी सोहोळ्याकरिता पालख्या, दिंड्यांचे शिखराकडे प्रयाण होईल. सलग दोन दिवस आयोजित केलेल्या सर्व कार्यक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन श्री मार्लेश्वर देवस्थान रिलिजस अँण्ड चॅरिटेबल ट्रस्ट, आंगवली आणि समस्त ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आले आहे.