क्रीडा- *पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला…
पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने मागील 7 पैकी 3 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघात प्रत्येकी एक बदल, पूजा जखमी
या सामन्यासाठी दोन्ही संघांनी मागील सामन्यातील प्लेइंग-11 मध्ये प्रत्येकी एक बदल केला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज पूजा वस्त्राकर हा सामना खेळत नाहीये. ती पूर्णपणे फीट नाही. त्याचबरोबर पाकिस्तानी संघात अरुब शाहला संधी देण्यात आली आहे.
महिला संघ T-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा सामना दुबईत खेळला जात आहे. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. दोन्ही संघांनी शेवटच्या सामन्यातील प्लेईंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी एक बदल केला आहे.
उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी टीम इंडियाला हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावाच लागेल, कारण पहिल्या सामन्यात टीम इंडियाला न्यूझीलंडविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
भारतासाठी चांगली गोष्ट म्हणजे या स्पर्धेत त्याने पाकिस्तानवर वर्चस्व राखले आहे. T-20 विश्वचषकात दोघांमध्ये आतापर्यंत 7 सामने खेळले गेले आहेत. यामध्ये भारताने 5 सामने जिंकले. पाकिस्तानला केवळ 2 सामने जिंकता आले आहेत.
दोन्ही संघांचे प्लेइंग-11
भारत: हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना, शेफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (यष्टीरक्षक), सजना सजीवन, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, आशा शोभना आणि रेणुका सिंग.
पाकिस्तान : फातिमा सना (कर्णधार), मुनिबा अली, गुल फिरोज, सिद्रा अमीन, अमाइमा सोहेल, निदा दार, तुबा हसन, आलिया रियाझ, नसरा संधू, अरुब शाह, सादिया इक्बाल.