
रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे इच्छुक होते, मात्र मंगळवारी रात्री उशिरा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी व पकी बार ४०० पार करण्यासाठी आपण लोकसभा निवडणुकीतून माघार घेत आहोत, आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती किरण उर्फ भैय्या सामंत यांनी सोशल मीडियावरून दिली आहे.
रत्न सिंधू योजनेचे संचालक किरण सामंत यांनी एक्सपोर्टलवर ट्विट करून लोकसभा इलेक्शन मधून माघार घेतल्याची केली पोस्ट…

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून शिवसेना शिंदे गट व भाजप यांच्यामध्ये चढाओढ सुरू होती. सिंधूरत्न योजनेचे सदस्य किरण सामंत हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून इच्छुक होते. किरण सामंत यांनी निवडणूक लढवण्याची तयारीही केली होती. प्रचाराची पहिली फेरीही पूर्ण केली होती. मात्र अचानक मंगळवारी रात्री आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी माघार घेत आहोत, अशी त्यांनी स्वतः सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. किरण सामंत यांच्या या पोस्टमुळे ही जागा भाजपला सोडली गेली आहे, हे स्पष्ट झाले आहे. तसेच येथून माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे हे निवडणूक लढवतील, हेही असेही स्पष्ट झाले आहे. मोदीजींचे 405 चा नारा बंद करण्यासाठी माघार घेत असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील भारतीय जनता पार्टी कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे.
उदय सामान्य यांनी घेतली होती देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांची भेट…
उद्योग मंत्री उदय सामंत काल नागपूरच्या दौऱ्यावर होते .त्यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस व नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगत होते. त्यानुसार देवेंद्र फडणीस यांची भेट झाल्यानंतर त्यांचे बंधू किरण सामान यांनी सदरचे एक्सपोर्टलवरून सदरची पोस्ट शेअर केली आहे. त्यामुळे इतके दिवसाचे राजकीय विश्लेषकांचे केलेले विश्लेषण आज खरे ठरले आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेमधून किरण सामंत इच्छुक होते. त्यांनी सामंजस्याची ची भूमिका घेतल्यामुळे महायुतीचे पारडे येथे जड झाले आहे. त्यामुळे इथून माहिती कडून देणार उमेदवार निवडून येण्याची शक्यता असल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
किरण सामान यांच्या ट्विट नंतर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण..
भारतीय जनता पार्टी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेतील कार्यकर्त्यांची टेटस रिंग्स मध्ये नारायण राणे यांना समर्थन करण्यात आले होते. ट्विट नंतर रात्री सर्व सोशल मीडिया वरती बातम्या फिरत आहेत. भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आनंदी झाले असून जोमाने कामाला लागण्याच्या पोस्टही व्हायरल होत आहेत. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कार्यकर्ते जोमाने कामाला लागण्याचा पोस्ट व्हाट्सअप वर फिरत आहेत. त्यामुळे आज नारायण राणे यांची उमेदवारीची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे.