तैवान ७.२ तीव्रतेच्या शक्तीशाली भूकंपाने हादरला; जपान, फिलीपिन्समध्ये त्सुनामीचा इशारा…

Spread the love

तैपेई- तैवान शक्तीशाली भूकंपाच्या धक्क्याने हादरला आहे. तैवानमध्ये सुमारे ७.२ तीव्रतेचा भूकंप झाला आहे. त्यानंतर जपानमध्ये त्सुनामीचा इशारा देण्यात आला. तैवान सरकारने जारी केलेल्या अपडेटनुसार, बुधवारी पहाटे तैवानची राजधानी तैपेईमध्ये हा भूकंप झाला. या भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या हुआलियन शहरापासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर असल्याचे सांगण्यात येते.

भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून देशभरातील रेल्वे सेवा बंद करण्यात आली आहे. या भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात 3 मीटर (9.8 फूट) उंचीपर्यंत लाटा उसळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने जपानमध्ये त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे. लोकांना समुद्रकिनाऱ्यांपासून दूर राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे. देशभरातील बचावकार्य पथकांना सतर्क करण्यात आले आहे.

भूकंपानंकर अनेक इमारती कोसळल्या आहेत. पूल आणि रस्त्यांवरील वाहने हालताना दिसले. आतापर्यंत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नसले तरी वित्तहानी मात्र मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्सुनामीचा इशारा दिल्याने लोकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. नागरिकांना सातत्याने हवामानाचे अपडेट्स दिले जात आहेत. पर्वतांच्या पायथ्याशी आणि समुद्राच्या किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना सुरक्षित स्थळी हलवलं जात आहे. त्सुनामीची शक्यता लक्षात घेऊन फिलीपिन्समध्येही सतर्कतेचा इशारा दिला आहे. फिलीपिन्सच्या भूकंप विज्ञान संस्थेने अनेक प्रांतांच्या किनारी भागासाठी त्सुनामीचा इशारा जारी केला आहे. येथे राहणाऱ्या लोकांना उंच भागात जाण्यास सांगितले आहे.

Author


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page